अनिल अंबानी यांना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर धपकन खाली, आता घातली ही बंदी

Anil Ambani : मुकेश अंबानी यांचे बंधु अनिल अंबानी यांच्या मागील शुक्लकाष्ठ काही कमी होताना दिसत नाहीत. एक चांगली बातमी आली की दोन वाईट बातम्या त्यांच्यासाठी येऊन धडकतात. एका वृत्तामुळे त्यांचा शेअर 5 टक्के तुटून 41.47 रुपयांवर आला. सोलर एनर्जी कॉर्पोरेशनने रिलायन्स पॉवरवर निर्बंध लादले आहेत.

अनिल अंबानी यांना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर धपकन खाली, आता घातली ही बंदी
रिलायन्स पॉवर अनिल अंबानी
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 12:18 PM

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर शुक्रवारी बाजार उघडताच तोंडघशी पडला. रिलायन्स पॉवरचा शेअर बीएसईवर 5 टक्क्यांनी घसरला. हा शेअर घसरून 41.47 रुपयांपर्यंत खाली आला. एका वृत्तामुळे हा शेअर धाराशायी झाला. सरकारी कंपनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (SECI) रिलायन्स पॉवर लिमिटेड, तिची सहाय्यक कंपनी आणि रिलायन्स NU BESS लिमिटेडवर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास 3 वर्षांसाठी रोख लावली. या घटनाक्रमाने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरला मोठा झटका बसला.

बंदीचे कारण तरी काय?

सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जूनमध्ये एक निविदा काढली होती. त्यात अनिल अंबानी यांच्या कंपनीने पण सहभाग नोंदवला. पण या निविदेसोबत त्यांनी खोटी कागदपत्रे जोडल्याचे समोर आले. सरकारी कंपनीने ही बाब लक्षात येताच अनिल अंबानी यांच्या कंपन्यांविरोधात कडक पाऊल टाकलं. सोलर एनर्जी कॉर्पोरेशनने या निविदेत 1000 MW/2000 MWh स्टँडअलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम प्रोजेक्ट्स सुरु करण्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबवली होती. रिलायन्स पॉवरने केलेला प्रकार समोर आल्यानंतर या प्रक्रियेतून रिलायन्स पॉवरची हकालपट्टी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सोलर एनर्जी कॉर्पोरेशनने या सर्व प्रक्रारावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र एनर्जी जेनरेशन लिमिटेड आताचे नाव रिलायन्स NU BISS लिमिटेडने या निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. पण त्यांनी जी कागदपत्रं जोडली होती. ती बनावट होती. अर्नेस्ट मनी डिपॉझिटच्या बदल्यात बँकेची हमी संदर्भातील कागदपत्रं बनावट असल्याचे समोर आले होते. रिलायन्स पॉवर, तिच्या उपकंपन्या आणि रिलायन्स NU BESS लिमिटेडवर ही बंदी 6 नोव्हेंबर 2024 रोजीपासून लागू झाला आहे.

नुकतंच कर्जमुक्त झाली कंपनी

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरने नुकतेच तिच्यावरील कर्जाचा बोझा कमी केला होता. कंपनीने सिंगापूर येथील लेंडर वर्डे पार्टनर्सचे 485 कोटी रुपयांचे कर्ज चुकते केले होते. या घाडमोडीनंतर कंपनी झिरो डेट कंपनी झाली होती. उपकंपनी रोजा पॉवर सप्लायला कर्जमुक्तीचा किताब मिळाला होता. कंपनीने लेंडर वर्टे पार्टनर्सचे सर्व 1318 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.