मच्छीच्या भावात एक डझन अंडी? अंड्याचे भाव वधारले; किती रक्कम मोजावी लागणार?

राज्यात थंडीचा जोर वाढत चालला असताना सर्वसामान्यांची आवडती अंडी कडाडली आहेत. अंड्यांच्या भावात अचानक उसळी आली असून अंडीच्या दर आवाक्या बाहेर गेले आहेत. राज्यात अवकाळी पावसानंतर ढगाळ वातावरणामुळे भाज्याची आवक वाढली असून भाज्यांचे दर मात्र घसरले आहेत.

मच्छीच्या भावात एक डझन अंडी? अंड्याचे भाव वधारले; किती रक्कम मोजावी लागणार?
egg rateImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 1:17 PM

मुंबई | 13 डिसेंबर 2023 : राज्यात अनेक ठिकाणी गारटा वाढला असून थंडीमुळे अंड्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. थंडीचा जोर वाढू लागल्याने अंड्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. अंड्याचे दरात प्रतिनग दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर प्रति डझन अंड्यांच्या दरात सहा ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाल्याने रविवारपर्यंत 80 ते 84 रुपये डझन दराने विकली जाणारी अंडी आता थेट 94 रुपये डझन दराने विकली जात आहेत. त्यामुळे आता मच्छीचा भाव अंड्यांना आला असल्याच्या प्रतिक्रीया सर्वसामान्य ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत.

हिवाळा जसा येऊ लागतो तसा अंड्यांच्या दरात मोठी वाढ होत असते. हिवाळ्याच्या हंगामामुळे अंड्याचा किरकोळ विक्रीचा दर काही भागात 90 रुपये प्रति डझन डझन वाढला आहे. अंधेरी लोखंडवाला, जोगेश्वरी पश्चिम आणि शिवाजी पार्कमध्ये सोमवारी अंड्यांचा दर डझनामागे 6 ते 10 रुपयांपर्यंत वाढून 90 रुपयांपर्यंत पोहचला आहे. तर वांद्रे, मालाड, नेरुळमध्ये अंड्यांचा दर 80 रुपये डझन सुरु होता. अंडी कडाडल्याने घरगुती, बेकर्स, मिठाईवाले, संस्थागत खरेदीदार आणि हॉटेल्स यांना सर्वांना दरवाढीचा बोजा पडणार आहे.

जानेवारीचा रेकॉर्ड मोडला

अंड्याचे जर जानेवारी 2023 महिन्यांत पहिल्यांदाच 90 रुपयांपर्यंत पोहचले होते. मंगळवारच्या राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने किरकोळ दर 78 रुपये प्रति डझन असल्याचे जाहीर केले आहे. परंतू वाहतूक आणि मजूरीच्या खर्चामुळे दुकानदार साधारण 6 ते 10 रुपये जादा आकारतात. अंडी महागल्याने सर्वसामान्यांचा प्रोटीनयुक्त आहार महागला आहे. कोरोनाकाळात अंड्यांना सर्वाधिक मागणी होती. कारण अंड्यांमुळे आरोग्यात सुधारणा होत असल्याने अंड्यांना प्रचंड मागणी वाढली होती.

भाजीपालादर आवाक्यात

अंड्यांचा भाव कडाडले असताना दुसरीकडे भाज्यांचा भाव मात्र घसरला आहे. गेल्या महिन्यात 80 ते 100 रुपये किलोचे दर असलेला भाजीपाला आता 40 ते 50 रुपये किलो आहे. मेथी, पालक या पालेभाज्या तर 10 ते 15 रुपये जुडीने विक्री होत आहेत. गेल्या महिन्यात 80 ते 100 रुपये किलो असलेल्या हिरव्या मटर शेंगा 25 ते 30 रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. बाजारात सध्या हिरव्या वाटाण्याच्या शेंगा आणि गाजराची आवक वाढली आहे. लाल गाजर 20 ते 40 रुपये किलो, तर वाटण्याच्या शेंगांना 25 ते 30 रुपये किलोचे दर आहे. आवक वाढल्यास दरात पुन्हा घसरण होईल असे म्हटले जात आहे.

भाव घसरण्याची चिन्हे

गेल्या आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस त्यानंतर सातत्याने ढगाळ वातावरण आहे. यामुळे तापमानात घसरण झाली. दुसरीकडे बाजारातीलआवक वाढून भाजीपाल्याचे दर कमी झाले. जळगाव शहरातील यावल, रावेर, मुक्ताईनगरसह नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक होते. दरवर्षी हिवाळ्यात आवक वाढून भाजीपाल्याचे दर घसरतात. सध्या बाजारात मुबलक भाजीपाला उपलब्ध आहे. आगामी काळात वातावरण पोषक राहिले तर उत्पादन वाढून भाव अजून कमी होतील असे म्हटले जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.