OpenAI ने काढले, Microsoft ने डोक्यावर घेतले, सॅम ऑल्टमन यांना लॉटरी

Sam Altman OpenAI | Microsoft ने OpenAI ला धोबीपछाड दिली आहे. ओपनएआयच्या संचालक मंडळाला मायक्रोसॉफ्टच्या या खेळीचा काही दिवसातच जोरदार झटका बसणार आहे. सत्य नडेला यांनी त्यांचा मित्र सॅम ऑल्टमन याला कंपनीत मोठ्या हुद्दावर रुजू करुन घेतले. दुसरीकडे बड्या गुंतवणूकदारांनी सॅमला परत आणण्यासाठी संचालकांना कोडींत पकडले आहे.

OpenAI ने काढले, Microsoft ने डोक्यावर घेतले, सॅम ऑल्टमन यांना लॉटरी
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 10:18 AM

नवी दिल्ली | 21 नोव्हेंबर 2023 : मायक्रोसॉफ्टने व्यावसायिक खेळीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. OpenAI कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीचा सहसंस्थापक आणि सीईओ सॅम ऑल्टमन याला अचानक बाहरेचा रस्ता दाखवला. तर मायक्रोसॉफ्टने त्याला मोठ्या हुद्दावर रुजू करुन घेतले. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी मित्रासाठी कंपनीचे दार उघडले. ओपनएआयला हा मोठा झटका मानण्यात येतो. सॅम ऑल्टमन याला माघारी बोलवा यामागणीसाठी बड्या गुंतवणूकदारांनी ओपनएआयच्या संचालक मंडळावर दबाव टाकला आहे. आता ही कंपनी कात्रीत अडकली आहे. त्यांचा आर्थिक पाठिंबा पण काढण्याची भीती कंपनीला सतावत आहे.

कृत्रिम बुद्धीमतेत मायक्रोसॉफ्टचा दबदबा

सत्य नडेला यांनी मोठा डाव साधला आहे. ओपनएआय या कंपनी कृत्रिम बुद्धीमतेत मोठी आघाडी घेतली होती. चॅटजीपीटीचा तर जगभर बोलबाला झाला होता. या सर्व प्रकल्पामागे सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन यांची प्रमुख भूमिका होती. आता या दोघांसाठी मायक्रोसॉफ्टने पायघड्या अंथरल्या. मायक्रोसॉफ्टच्या New Advanced AI Research Team चे ते प्रमुख असतील. 2015 मध्ये सॅम ऑल्टमन यांनी मित्रासह OpenAI ची सुरुवात केली होती.

हे सुद्धा वाचा

मित्र आल्याने साजरा केला आनंद

भारतीय वंशाचे सत्य नडेला हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ आहेत. ते सॅम ऑल्टमनचे मित्र पण आहेत. सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन हे दोघे पण कंपनीत रुजू झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्यासाठी कृत्रिम बुद्धीमतेचा खास प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प विकसीत आणि यशस्वी व्हावा यासाठी सर्व संसाधने पुरवणार असल्याचे नडेला यांनी स्पष्ट केले.

ओपनएआयच्या अडचणीत वाढ

सॅम ऑल्टमन याला परत माघारी बोलवा अशी मागणी ओपनएआयच्या बड्या गुंतवणूकदारांनी केली आहे. त्यांनी संचालक मंडळावर दबाव आणला आहे. त्यात सॅम ऑल्टमन आणि पूर्वीचा अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन हे मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्याने ओपनएआयच्या अडचणीत वाढ होणार आहे. कदाचित कंपनीचे गुंतवणूकदार त्यांची भूमिका बदलवू शकतात. Thrive Capital आणि Tiger Global Management या बड्या गुंतवणूकदार फर्मच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.