Cooperative Credit Society : पंतसंस्था निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक उमेदवारांना दणका; आता ठेवावे लागणार फिक्स डिपॉझिट

पंतसंस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सहकार विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार आता जर एखाद्या व्यक्तीला सहकारी पतसंस्थेचे संचालक व्हायचे असेल तर संबंधित व्यक्तीला त्या पतसंस्थेमध्ये एक ठारावीक रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवावी लागणार आहे.

Cooperative Credit Society : पंतसंस्था निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक उमेदवारांना दणका; आता ठेवावे लागणार फिक्स डिपॉझिट
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 7:45 AM

मुंबई : पंतसंस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सहकार विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार आता जर एखाद्या व्यक्तीला सहकारी पतसंस्थेचे संचालक व्हायचे असेल तर संबंधित व्यक्तीला त्या पतसंस्थेमध्ये एक ठारावीक रक्कम मुदत ठेव (Fixed deposit) म्हणून ठेवावी लागणार आहे. अनेक जण हे पंतसंस्थेचे नाममात्र सदस्य असतात, त्यांचा पंतसंस्थेच्या कामाशी काहीही संबंध नसतो. मात्र असे सदस्य (Members)देखील निवडणुकीच्या (Election) रिंगणात उतरतात. त्यामुळे आता अशा उमेदवारांना आळा घालण्यासाठी सहकार विभागाकडून फिक्स डिपॉझिटची अट घालण्यात आली आहे. जर तुमचे संबंधित संस्थेमध्ये फिक्स डिपॉझिट असेल तरच तुम्हाला निवडणूक लढवता येणार आहे. याबाबत सहकार आयुक्तांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यातील सर्वच पतसंस्थांनी आपल्या उपविधीत याबाबतची दुरुस्ती करावी असेही सहकार आयुक्तांनी म्हटले आहे.

काय आहे नवा निर्णय?

अनेक जण पंतसंस्थेमध्ये कोणतीही ठेव ठेवली नसताना, तसेच पंतसंस्थेच्या कामाशी काहीही संबंध नसताना निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र आता अशा गोष्टींना चाप बसणार आहे. यासाठी सहकार विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार जर कोणालाही पतसंस्थेची निवडणूक लढवायची असेल तर त्याला आधी संबंधित पतसंस्थेमध्ये एक ठराविक रक्कम मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) ठेवावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला निवडणुकीला उभे राहाता येईल. याबाबत सहकार आयुक्तांकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील सर्वच पतसंस्थांनी आपल्या उपविधीत याबाबतची दुरुस्ती करावी असेही सहकार आयुक्तांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

बचत खात्यावरील रक्कम ही ठेव नाही

अनेक जण पंतसंस्थेच्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी त्यांचे त्या पतसंस्थेमध्ये जे बचत खाते असते, त्यावर ठरावीक रक्कम टाकतात. व हीच रक्कम मुदत ठेव असल्याचे दाखवत उमेदवारी अर्ज भरतात. उमेदवारी अर्ज स्विकारल्यानंतर ती रक्कम उमेदवार परत काढून घेतात. याची देखील सहकार आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, बचत खात्यावरील रक्कम म्हणजे मुदत ठेव नव्हे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.