Gold Silver Record : खरेदीदारांना मोठी संधी, सोने-चांदीने दरवाढीला दिली सुट्टी!

Gold Silver Record : शनिवार-रविवार सराफा बाजारात वर्दळ वाढली आहे. सोने-चांदीने दरवाढीला सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी दिल्याने खरेदीदारांचा उत्साह वाढला आहे. भावात किती झाली घसरण..

Gold Silver Record : खरेदीदारांना मोठी संधी, सोने-चांदीने दरवाढीला दिली सुट्टी!
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 9:19 AM

नवी दिल्ली : सोने-चांदी(Gold Silver Price) नव-नवीन रेकॉर्ड नावावर करत आहे. गेल्या सहा महिन्यात या मौल्यवान धातूंनी त्यांचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आहे. प्रत्येक वेळी एक नवा विक्रम करण्याची ही सवय ग्राहकांच्या, खरेदीदारांच्या मुळावर आली आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराचा (Sarafa Market) उंबरठा न ओलंडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. तरीही सराफा बाजारात कमालीची उलाढाल होत आहे. गुंतवणूकदारांना तर सहा महिन्यापूर्वी केलेल्या गुंतवणूकीवर छप्परफाड परतावा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांचा विचार करता, शनिवार आणि रविवारी सोने-चांदीने दरवाढीला सुट्टी दिली आहे. भावातही घसरण झाली आहे. त्याचा फायदा ग्राहकांना घेता येईल.

कमालीची घसरण गुडरिटर्न्सनुसार, आज 16 एप्रिल, रविवारी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट एक तोळा सोन्यात 10 रुपयांची घसरण झाली आहे. पण शनिवारी संध्याकाळी किंमतीत मोठी पडझड झाली होती. काल सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,810 रुपये प्रति तोळा होता. आज सकाळी प्रति तोळा हा भाव 56,090 रुपयांवर आला. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,960 रुपये होती. रविवारी सकाळी एका तोळा सोन्याची किंत 61,180 रुपये आहे. भावात जवळपास 800 रुपये प्रति तोळा घसरण झाल्याचे दिसून येते.

हे सुद्धा वाचा

चांदीची चमक फिक्की चांदी शुक्रवारी संध्याकाळी 79,600 रुपये किलो होती. यामध्ये शनिवारी 1100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,500 रुपये किलो झाला. रविवारी हाच भाव कायम होता. 11 एप्रिलपासून चांदीच्या किंमतीत दरवाढ सुरु होती. पण गेल्या दोन दिवसांपासून चांदीची चमक फिक्की पडली आहे.

रेकॉर्ड गाठण्याची शक्यता सोने-चांदीने 5 एप्रिल रोजी रेकॉर्ड केला होता. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,090 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,180 रुपये होती. सोन्याला 70,000 टप्पा गाठायला आता फार वेळ लागणार नाही. तर चांदीने आज यु-टर्न घेतला असला तरी चांदी लवकरच 80,000 चा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आज भाव जाहीर नाही इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत. आता भाव सोमवारी जाहीर करण्यात येईल.

चार शहरातील भाव गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,940 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,030 रुपये होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,940 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,030 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,940 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,030 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 55,970 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,060 रुपये आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

अशी तपासा शुद्धता

  1. हॉलमार्किंगच्या आधारे तुम्ही खरे आणि खोटे सोने तपासून शकता.
  2. त्यासाठी दागिने, सोन्यावरील हॉलमार्किंग तुम्ही तपासून घ्या
  3. सोन्याचा हॉलमार्क 375 असेल तर सोने 37.5 टक्के शुद्ध असेल
  4. हा हॉलमार्क 585 असेल तर हे सोने 58.5 टक्के शुद्ध आहे
  5. 750 हॉलमार्क असलेले सोने 75.0 टक्के शुद्ध असते.
  6. 916 हॉलमार्क सोने 91.6 टक्के शुद्ध असते
  7. 990 हॉलमार्क सोने 99.0 टक्के शुद्धतेची हमी देते
  8. 999 हॉलमार्क सोने हे 99.9 टक्के शुद्ध असते

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.