या शेअरला गरिबीच ठावं नाय, एकाच वर्षात केले की मालामाल

Multibagger Stock : शेअर बाजारात अनके तगडे स्टॉक आहेत. तर काही धुमकेतू सुद्धा आहेत. त्यावर तुम्ही स्वार झाला तर मालामाल झाल्याशिवाय राहत नाही. जोखीम घेतल्याशिवाय शेअर बाजारात अनेकदा मोठं यश लाभत नाहीत म्हणतात. या शेअरने गुंतवणूकदारांची एकाच वर्षात गरिबी दूर केली आहे.

या शेअरला गरिबीच ठावं नाय, एकाच वर्षात केले की मालामाल
गुंतवणूकदारांची गरिबी केली दूर
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 5:36 PM

शेअर बाजारात तुम्ही पण मल्टिबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर या शेअरच्या कामगिरीवर एकदा नजर फिरवाच. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) लिमिटेड (TRIL) या कंपनीने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांची गरिबी एकाच वर्षांत पळवून लावली आहे. त्यांना छप्परफाड रिटर्न दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे. 10 एप्रिल रोजी TRIL च्या शेअरमध्ये एकावेळी 3.77 टक्क्यांची तेजी दिसून आली. बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 518.80 रुपयांवर होता. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 770 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

नफ्याचे जुळवले गणित

Transformers & Rectifiers India Ltd Share ने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जानेवारी ते मार्च तिमाहीत मोठी कामगिरी बजावली. चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 4 पटीने वाढला. हा नफा 41.62 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या समान तिमाहीत कंपनीने 9.60 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट कमावला. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत एकूण नफा 439.50 कोटी रुपयांहून 514 कोटी रुपये झाला. कंपनीचा आर्थिक वर्ष 2023-24 मधील नफा 47.01 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये नफ्याचा आकडा 42.35 कोटी रुपये होता.

हे सुद्धा वाचा

1 लाखांचे झाले 8 लाख

TRIL चा शेअर गेल्या 12 व्यापारी सत्रात तेजीत आहे. एका वर्षापूर्वी म्हणजे 10 एप्रिल 2023 रोजी या शेअरची किंमत 59.45 रुपये होती. आता ती वाढून 517 रुपये इतकी झाली आहे. याचा अर्थ या मल्टिबॅगर शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना जवळपास 770 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज या गुंतवणुकीचे मूल्य 8,69,638 रुपये झाले असते.

तेजीचे सत्र कायम

गेल्या एका महिन्यात ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअरची किंमत 57 टक्क्यांनी उसळली आहे. गेल्या सहा महिन्यात या मल्टिबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना 204 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 2024 मध्ये आतापर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत 116 टक्के वधारली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.