Big Company Story | स्वयंपाक घरातून झाली सुरुवात, या कंपनीने जागतिक बाजारपेठेत अशी ठोकली मांड

Big Company Story | नागपूरमधील या उत्पादनाने भारतातच नाही तर जगातील अनेक देशात त्यांची ओळख निर्माण केली आहे. या कंपनीचे अनेक उत्पादनं बाजारात हातोहात विक्री होतात. केशव विष्णु पेंढरकर यांनी 1952 मध्ये या कंपनीची पायाभरणी केली होती. स्वयंपाक घरातून ही आयुर्वेदिक प्रोडक्ट सुरु झाले होते.

Big Company Story | स्वयंपाक घरातून झाली सुरुवात, या कंपनीने जागतिक बाजारपेठेत अशी ठोकली मांड
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 5:55 PM

नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : नागपूरमधील या कंपनीने बहुराष्ट्रीय कंपन्यांना तगडे आव्हान उभं केलं. बाहेरील उत्पादनाच्या जाहिरातींचा मारा असताना ही या कंपनीचे काही प्रोडक्ट आजही बाजारात हातोहात विक्री होता. केशव विष्णु पेंढरकर यांनी नागपूरमध्ये मोठ्या हिंमतीने त्यांचा अभिनव प्रयोग राबविला. सुरुवातीला अनेक टप्पेटोणपे त्यांना खावे लागले. उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक प्रयोग करावे लागले. हे प्रोडक्ट गावोगावी जाऊन विक्री करावे लागले. स्वयंपाक घरातून या उत्पादनाची सुरुवात झाली होती. केशव विष्णु पेंढरकर हे स्वस्त धान्य दुकानदार होते. त्यांना सुचलेल्या अभिनव कल्पनेतून आणि मेहनतीतून आज हा मोठा ब्रँड उभा राहिला आहे.

पहिला आयुर्वेदिक ब्रँड

यावेळी आयर्वेदिक उत्पादनं तयार करणाऱ्या कंपन्यांचे पीक आले आहे. अनेक नवीन स्टार्टअप्स पण आले आहेत. पतंजली एक मोठा ब्रँड आहे. पण विकोने (VICCO) आयुर्वेदात पहिला अभिनव प्रयोग केला. विकोने आयुर्वेदवर आधारीत उत्पादनं 1952 मध्ये तयार केले आणि ते बाजारात उतरवले. टूथपेस्ट आणि पाऊडर स्वरुपात विको ही देशातील पहिली आयुर्वेदीक कंपनी म्हणावी लागेल.

हे सुद्धा वाचा

विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी

VICCO या कंपनीचे पूर्ण नाव विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी असे आहे. नागपूरमधील केशव विष्णू पेंढरकर यांनी 1952 साली तिची स्थापना केली होती. स्वस्त धान्य दुकानातून त्यांना मोठी कमाई नव्हती. त्यांना काही तरी वेगळं करायचं होतं. स्वप्नाचा पाठलाग करत ते कुटुंबासह मुंबईत दाखल झाले.

अनुभवातून शिकले

पेंढरकर यांनी अनेक छोटे व्यवसाय केले. त्यात चुका झाल्या. या चुकातून ते शिकत गेले. त्याचेवेळी त्यांचे लक्ष एलोपथिक औषधं, पाँड्स, निव्हिया, अफगाण स्नो यासारख्या कॉस्मेटिक पदार्थांनी वेधले. हे सर्व परदेशी ब्रँड होते. त्याचवेळी आयुर्वेदिक उत्पादन तयार करण्याची कल्पना त्यांना सूचली.

स्वयंपाक घरात पहिले प्रोडक्ट

3 रुमच्या घरात त्यांनी स्वयंपाक घरात त्यांच्या उत्पादनाचा श्रीगणेशा केला. दुसऱ्या खोलीत गोदाम आणि ऑफिस तयार केले. अशाप्रकारे विकी कंपनीची सुरुवात झाली. यामध्ये विको वज्रदंती टूथ पाऊडरची निर्मिती करण्यात आली. या प्रोडक्टमध्ये 18 वनौषधीचा वापर केल्याचा दावा करण्यात आला.

अपयश पचवून यशाचा रस्ता

सुरुवातीला केशव यांनी घरोघरी जाऊन हा उत्पादन विक्रीचा प्रयोग केला. त्यांनी सोबत मुलाला पण घेतले. पण हे काम सोप्पं नव्हतं. त्याकाळी लोकांची त्यांना बोलणी खावी लागली. त्यांना अनेक ठिकाणी अपयशाचे तोंड पहावे लागले. पण केशव चिकाटीबाज होते. काही दिवसांनी हे उत्पादन दर्जेदार असल्याचे लक्षात आले. कंपनी चांगली चालायला लागल्यावर पेंढरकर यांनी तिची नोंदणी केली. आज ही कंपनी अब्जावधीची उलाढाल करते.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.