Penny Stock : छोटूरामची हनुमान उडी! गुंतवणूकदार तर अजूनही वाटत आहेत पेढे

Penny Stock : या स्मॉलकॅप कंपनीने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या शेअरने जवळपास 225 टक्के परतावा दिला.

Penny Stock : छोटूरामची हनुमान उडी! गुंतवणूकदार तर अजूनही वाटत आहेत पेढे
करामती स्टॉक
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 5:20 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) जोरदार चढउतार सुरु आहे. बाजारातील कोणता शेअर काय करामत करेल तर एखादा तुम्हाला कंगाल करेल, हे सांगताच येत नाही. बाजारात जोरदार परतावा देणारे अनेक स्टॉक आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार अवघ्या काही वर्षांतच, तर कधी कधी एका दिवसातच करोडपती होतात. या स्मॉलकॅप कंपनीने (Small Cap Company) गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या शेअरने गुंतवणूकदारांना 225 टक्के परतावा दिला. या शेअरमुळे गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले झाली. या शेअरमध्ये 70 टक्के तेजी दिसून आली.

अपर सर्किट लागले मंगळवारी 18 एप्रिल रोजी शेअर बाजारात व्यापारी सत्र सुरु होताच DCM Financial Services या कंपनीच्या स्टॉकमध्ये जोरदार तेजी दिसून आली. बाजार सुरु होताच काही वेळेत, या शेअरमध्ये अपर सर्किट लागले . या शेअरमध्ये 9.48 टक्के उसळी आली. हा शेअर 6.35 रुपयांवर पोहचला.

शेअरचा भाव वधारला DCM Financial Services च्या या स्टॉकमध्ये गेल्या पाच व्यापारी सत्रात 70 टक्के वाढ झाली. 11 एप्रिल रोजी हा स्टॉक 3.80 रुपयांवर होता. 12 एप्रिल रोजी हा शेअर 4.05 रुपयांवर पोहचला. 13 एप्रिल रोजी 4.85 रुपये तर 17 एप्रिल रोजी हा स्टॉक 5.80 रुपयांवर व्यापार करत होता. 18 एप्रिल रोजी या शेअरमध्ये 9.48 टक्के उसळी आली. हा शेअर 6.35 रुपयांवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

एका वर्षात इतका परतावा गेल्या पाच दिवसांत डीसीएम फायनेन्शिअल सर्व्हिसेजने एका वर्षात जोरदार परतावा दिला आहे. या स्टॉकचा भाव एका वर्षात 126.79 टक्के वाढला. 18 एप्रिल 2022 रोजी या शेअरची किंमत 2.80 रुपये होती. 22 सप्टेंबर 2022 रोजी या स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. हा शेअर तब्बल 11.20 रुपयांवर पोहचला. तर या शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी भाव 2.50 रुपये होता.

पाच वर्षांत 225 टक्के रिटर्न गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या पाच वर्षांच्या कालावधीत या शेअरने जवळपास 225 टक्के परतावा दिला. ही स्मॉलकॅप कंपनी इक्विपमेंट लिजिंग, हायर पर्चेज, इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट, बिल सवलत यासारख्या सेवा पुरवते. या स्मॉलकॅप कंपनीने (Small Cap Company) गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या शेअरमुळे गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले झाली.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.