Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस सिलेंडर महागला, आजपासून या सेवांमध्ये झाला बदल

Gas Cylinder Price Hike Today | नोव्हेंबर महिन्याची सुरुवातच या बदलांनी झाली आहे. त्यात गॅस सिलेंडर महाग झाला आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर दिसेल. जीएसटी, लॅपटॉप आयातीवरील शुल्कासंबंधी आणि इतर अनेक नियमांत बदल होत आहे. या महिन्यात बँकांना इतक्या सुट्या आहेत. त्यामुळे बँकेसंबंधीची कामे सुट्टी पाहूनच करा.

गॅस सिलेंडर महागला, आजपासून या सेवांमध्ये झाला बदल
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 11:00 AM

नवी दिल्ली | 1 नोव्हेंबर 2023 : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच गॅस सिलेंडर दरवाढीने झाली. दिवाळीचा फराळ यामुळे वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल. आता दिवाळी तोंडावर आली आहे. त्यातील हे काही बदल ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम करतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुदत ठेव योजनेच्या नियमात बदल केला आहे. श्रीमंत ग्राहकांना या बदलाचा फायदा होईल. बीएसईवरील देवाण-घेवाणीबद्दल पण बदल होत आहे. आर्थिक नियमातील या बदलाचा परिणाम दिसून येईल. सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा बोजा पडेल. त्यांना दिवाळीत अधिक खर्च करावा लागू शकतो.

गॅस सिलेंडरच्या भावात वाढ

सणासुदीच्या काळात ग्राहकांना महागाईचा झटका लागला. आजपासून देशात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांपेक्षा अधिकची तेजी दिसून आली. त्याचा परिणाम रेस्टॉरंट, हॉटेलपासून मिठाई, दिवाळीच्या फराळावर दिसून येईल. या शेव,चिवड्यासह इतर तळीव पदार्थ महाग होतील. बाहेरुन घरात येणाऱ्या खाद्यवस्तू महाग होतील.

हे सुद्धा वाचा

शेअर बाजारात हा बदल

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (BSE) आजपासून बदल दिसेल. 1 नोव्हेंबरपासून डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये देवाण-घेवाणीसाठी जादा शुल्क मोजावे लागेल. गेल्या 20 ऑक्टोबर रोजी याविषयीचा निर्णय घेतला होता. S&P BSE Sensex Option मध्ये हा बदल दिसून येईल. किरकोळ गुंतवणूकादारांवर या शुल्क वाढीचा परिणाम होईल.

बँकांना सुट्या

सणावारात बँकांना नोव्हेंबरमध्ये सुट्यांचा सुकाळ आहे. सुट्यांची पण एकप्रकारे दिवाळी आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर रविवार-शनिवारसह इतर दिवस मिळून 15 सुट्यांचा पाडाव आहे. त्यामुळे बँकेचे ऑफलाईन काही काम असेल तर या सुट्या पाहुनच करावीत.

GST नियमात पण बदल

100 कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त व्यवसाय, व्यापार करणाऱ्या उद्योगांसाठी नियम बदलला आहे. त्यांना 1 नोव्हेंबर ते 30 दिवसांच्या आता ई-चलन पोर्टलवर जीएसटी चलना अपलोड करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (NIC) ही माहिती दिली. जीएसटी प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात याविषयीचा निर्णय घेतला होता.

लॅपटॉप आयातीची डेडलाईन केंद्र सरकारने 30 ऑक्टोबरपर्यंत HSN 8741 या कॅटेगिरीतील लॅपटॉप, टॅबलेट, पर्सनल कंम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयतीवर सवलत दिली होती. आज या निर्णयात केंद्र सरकार काय बदल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार याप्रकरणी भूमिका जाहीर करु शकते.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.