Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलॉन मस्कवर लक्ष्मी रुसली, श्रीमंतांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये पण नाही

Billionaire Elon Musk : एलॉन मस्क हा अतिरेकी प्रयोगशील व्यक्ती म्हणून ओळखल्या जातो. त्याचे अनेक प्रयोग फसतात, चालतात, भरारी घेतात. पण तो थकत नाही. सध्या सर्वच बाजूने तो स्पर्धेत घेरला गेला आहे. या प्रयोगाने त्याला श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरुन बेदखल केले आहे. यंदा त्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

एलॉन मस्कवर लक्ष्मी रुसली, श्रीमंतांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये पण नाही
एलॉन मस्कवर धनदेवता रुसली
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 2:31 PM

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने अजून एक कामगिरी नावावर नोंदवली आहे. तो जगातील तिसरा सर्वात श्रींमत व्यक्ती झाला आहे. बरेच वर्षे पहिल्या क्रमांकाचा बिरुदावली मिरवणारा एलॉन मस्क याचा श्रीमतांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये निभाव लागला नाही. त्याच्यावर लक्ष्मी, कुबेर सर्व धनदेवता रुसल्या आहेत. आता मस्क थेट चौथ्या क्रमांकावर आला आहे. या वर्षात त्याच्या संपत्तीत 48.4 अब्ज डॉलरची घसरण नोंदविण्यात आली. तर झुकरबर्गची संपत्ती 58.9 अब्ज डॉलरने वधारली.

मेटाची रॉकेट भरारी शेअर बाजारात

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने शुक्रवारी शेअर बाजारात तुफान आणले. मेटाचा शेअर गगनाला भिडला. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, या घडामोडींमुळे झुकरबर्ग 187 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला. तर मस्क 181 अब्ज डॉलरसह खाली घसरला. झुकरबर्ग हा वर्षात सर्वाधिक कमाई करणारा श्रीमंत व्यक्ती ठरला आहे. तर सहाजिकच मस्क हा सर्वाधिक नुकसान झालेला श्रीमंत आहे.

हे सुद्धा वाचा

चार वर्षानंतर तिसऱ्या स्थानावर

  • शुक्रवारी झुकरबर्गच्या नेटवर्थमध्ये 5.65 अब्ज डॉलरची तेजी तर मस्कच्या एकूण संपत्तीत 4.52 अब्ज डॉलरची घसरण
  • झुकरबर्ग 16 नोव्हेंबर 2020 नंतर पहिल्यांदा जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर
  • यंदा टेस्लाने मस्कला झटका दिला. कंपनीच्या शेअरमध्ये 34% घसरण आली
  • S&P 500 इंडेक्समध्ये हा शेअर सर्वात वाईट कामगिरी करणारा ठरला
  • इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणी घसरल्याचा फटका, चीनशी वाढत्या स्पर्धेचा मस्कला फटका
  • जर्मनीतील नवीन समीकरणे कंपनीच्या अंगलट आले
  • मेटाचा तिमाही महसूल वधारला. AI चा फायदा शेअर बाजारात दिसला
  • झुकरबर्गच्या मेटा कंपनीचा शेअर 49% वधारला
  • S&P 500 इंडेक्समध्ये पाचवा सर्वात चांगले प्रदर्शन करणारा स्टॉक

यादीतील टॉप-10 श्रीमंत

  1. LVMH Moet Hennessy चे चेअरमन बर्नार्ड अरनॉल्ट 223 अब्ज डॉलरसह पहिले
  2. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस 207 अब्ज डॉलरसह दुसऱ्या स्थानावर
  3. तिसऱ्या स्थानी मार्क झुकरबर्ग तर चौथ्या क्रमांकावर एलॉन मस्क
  4. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 153 अब्ज डॉलरसह पाचव्या स्थानावर
  5. स्टीव्ह बालमर 147 अब्ज डॉलरसह सहाव्या क्रमांकावर
  6. 138 अब्ज डॉलरसह वॉरेन बफे हे यादीत सातव्या स्थानी
  7. लॅरी पेज आठव्या, लॅरी एलिनस नऊ, तर सर्गेई ब्रिन दहाव्या क्रमांकावर
  8. मुकेश अंबानी 112 अब्जासह 11 व्या क्रमाकांवर
  9. तर गौतम अदानी 104 अब्जासह 14 व्या स्थानी
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.