भारतात या ठिकाणी सापडला असा अनोखा हिरा, या आधी कधीच पाहिला नव्हता.

| Updated on: Apr 15, 2023 | 7:19 PM

डी बियर्स इस्टिट्यूट ऑफ डायमंड्सने अलिकडेच हा हिरा सापडल्याची घोषणा केली आहे. हा एक दुर्मिळ हिरा असून असाच हिरा रशियातील सैबेरियात सापडला होता.

भारतात या ठिकाणी सापडला असा अनोखा हिरा, या आधी कधीच पाहिला नव्हता.
The-Beating-Heart-Diamond
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली :  हीरा सर्वात मौल्यवान मानला जात असतो. हिऱ्यातून किती प्रकाश परावर्तित होतो त्यावरूनही त्याची किंमत ठरत असते. परंतू तुम्ही कधी हृदय धडकणाऱ्या ( Beating Heart Diamond ) बद्दल कधी ऐकले आहे का ? आज तुम्हाला या अनोख्या दुर्लभ हिऱ्याबद्दल माहीती मिळणार आहे. या हिऱ्याला का बिटींग हार्ट डायमंड असे नाव दिले आहे असा सवाल तुम्हाला पडला असेल तर त्याचे गुपित असे आहे की…या हिऱ्याच्या आत आणखी एक हिरा दडलेला आहे. डायमंड सिटीच्या हिरे निर्मात्यानी या हिऱ्याचा शोध लावला असून त्यांनीच त्याचे नाव ‘बिटींग हार्ट’ म्हणजेच ‘दील धडकणारा हीरा’ असे ठेवले आहे.

हा अनोखा हिरा 0.329 कॅरेटचा असून D-कलर्ड वर्गवारीतला आहे. विडी ग्लोबल यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये त्याचा शोध लावला होता. साईट होल्डर वीडी ग्लोबलचे अध्यक्ष वल्लभ वाघसिया यांनी सांगितले की आमच्या सुरत येथील फॅसिलिटीमध्ये कच्च्या हिऱ्यांचा तपास करताना हा अनोखा हिरा सापडला. ज्यात आणखीएक तुकडा अडकलेला आहे. जो स्वतंत्रपणे त्याच्या आत फिरत होता. हा प्रकार आम्ही कधी पाहिला नव्हता की हिऱ्याच्या आतही हिरा असू शकतो.

आम्ही या हिऱ्याला पाहताच आमची जी पहीली प्रतिक्रीया आली त्यानूसार त्याच नाव ‘बिटींग हार्ट’ असे ठेवले आहे. डी बियर्सशी (DBID) केलेल्या कराराप्रमाणे या हिऱ्याला पुढील तपासासाठी युकेच्या मेडेनहेड येथे पाठवण्यात आले आहे. वीडीजी एक हीरा निर्माता फर्म असून ती मुंबईतून कार्यरत असून जिचा व्यापार जगभरात पसरलेला आहे.

डी बियर्स इस्टिट्यूट ऑफ डायमंड्सने अलिकडेच या हिऱ्याची घोषणा केली आहे. हा एक दुर्मिळ हिरा असून असाच हिरा रशियातील सैबेरियात सापडला होता. त्याला ‘मॅट्रीशोका’ ( Matryoshka ) असे रशियाच्या बाहुलीचे नाव देण्यात आले होते. साल 2019 मध्ये अलरोसातील न्यूरबा येथील खाणीत तो पहील्यांदा सापडला होता. डी बियर्स ग्रुप इग्नाईटच्या तांत्रिक शिक्षिका सामंथा सिबली यांनी सांगितले की माझ्या हिरा क्षेत्रातील तीन दशकाच्या कारकीर्दीत ‘बिटींग हार्ट’ सारखा हिरा पाहीला नव्हता.