Aadhaar Card | आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करा, अन्यथा कोरोना लसीकरणाला मुकाल!

इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच कोरोनाविरूद्धच्या या मोठ्या लढ्यातही आधार कार्ड एक मोठी भूमिका बजावणार आहे.

Aadhaar Card | आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करा, अन्यथा कोरोना लसीकरणाला मुकाल!
Aadhaar Card Uidai
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 11:30 AM

मुंबई : शनिवारपासून जगातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. भारतात कोरोना विषाणूच्या विरोधात युद्धमोहीम सुरू झाली आहे. 16 जानेवारीपासून देशभरातील नागरिकांना लस देण्याचे काम सुरू होणार आहे. या लसीकरणात आधार कार्डची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे (Aadhaar Card mobile number linking mandatory for corona vaccination).

इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच कोरोनाविरूद्धच्या या मोठ्या लढ्यातही आधार कार्ड एक मोठी भूमिका बजावणार आहे. कोरोनाची लस मिळवण्यासाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता असणार आहे. जर, आपण आपले आधार कार्ड मोबाईल फोन नंबरशी लिंक केलेले नसेल, तर सर्वात आधी हे महत्त्वाचे काम उरकून घ्या. कारण या लसीची सर्व माहिती आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येणार आहे. सध्या कोरोना लसीकरणाच्या तयारीची अंतिम फेरी सुरू असून, सर्व राज्यांना लस देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आधार कार्ड आवश्यक!

शनिवारपासून (16 जानेवारी) सुरू होणार्‍या लसीकरण कार्यक्रमासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार, सरकारने कोरोना लसीकरणासाठी आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडणे बंधनकारक केले आहे.

एखाद्याला कोरोना लस घ्यायची असल्यास, त्याचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असला पाहिजे. तरच त्या व्यक्तीला लस दिली जाणार आहे.

मोबाईल क्रमांकासाठी आधारशी लिंक आवश्यक

भारत सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत की, सर्व राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील लोकांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक केले पाहिजेत, जेणेकरुन लसीकरणासाठीचे संदेश पाठवणे सोपे होईल.

जर, आपण आधीच आधार कार्ड मोबाईल फोन नंबरशी लिंक केले असेल, तर आपल्याला हे काम पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. परंतु, ज्यांनी अद्याप आपला आधार क्रमांक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशी जोडलेला नाही, ते लोक हे काम करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जाऊ शकतात (Aadhaar Card mobile number linking mandatory for corona vaccination).

लसीचा प्रत्येक डेटा नोंदवला जाणार!

वास्तविक वेळेत लसीकरणाचा डेटा मिळण्यावर सरकारने बराच जोर दिला आहे. जे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सादर करतील, त्यांना त्वरित एक अनोखा आरोग्य आयडी (यूएचआयडी) दिला जाईल. एकदा यूएचआयडी तयार झाल्यावर त्या व्यक्तीच्या आरोग्याची नोंद ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होईल.

रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड गरजेचे

जर, तुम्हाला कोरोनाची लस घ्यायची असेल, तर सर्व प्रथम नोंदणी करावी लागेल. लस नोंदणी व लसीकरणाच्या वेळी फोटो असणारे ओळखपत्र आवश्यक असेल. नोंदणीनंतरच एसएमएसद्वारे स्थान व वेळ याची  माहिती मिळेल. नोंदणीनंतरच ही लस त्या व्यक्तीस देण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीस 28 दिवसांच्या अंतरात दोनदा लसी दिली जाईल. ज्याचा वेळ व ठिकाणही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे मिळेल. लसीकरणानंतर लाभार्थ्यास त्याच्या मोबाईल नंबरवर क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्रही पाठवले जाईल.

ओळखपत्र म्हणून ‘ही’ कागदपत्रे सादर करावी लागणार

नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी, आपल्याला फोटो असणारे ओळखपत्र दाखवावे लागेल. यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, जॉब कार्ड, पेन्शन रेकॉर्ड, मनरेगा कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे जारी केलेले सर्व्हिस कार्ड या पैकी एक ओळखपत्र सादर करावे लागेल.

(Aadhaar Card mobile number linking mandatory for corona vaccination)

हेही वाचा :

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.