‘IMF’ forecast : चालू वर्षात भारताचा जीडीपी 8.2 टक्के राहण्याचा अंदाज, जागतिक बँकेकडूनही घसरणीचे संकेत
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी (GDP) 8.2 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी वर्तवलेल्या एका अंदाजामध्ये नाणेनिधीने भारताचा आर्थिक वृद्धी दर हा 9 टक्के राहील असा अंदाज (IMF forecast) वर्तवला होता.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जीडीपी (GDP) 8.2 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी वर्तवलेल्या एका अंदाजामध्ये नाणेनिधीने भारताचा आर्थिक वृद्धी दर हा 9 टक्के राहील असा अंदाज (IMF forecast) वर्तवला होता. मात्र आता वर्तवण्यात आलेल्या सुधारीत अंदाजात भारताच्या जीडीपीमध्ये चालू आर्थिक वर्षात घसरण होऊ शकते असे म्हटले आहे. यंदा भारताचा आर्थिक वृद्धी दर हा 8.2 टक्के राहणार असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 2023-24 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर कसा असेल याबाबत देखील अंदाज वर्तवण्यात आला होता. पुर्वीच्या अंदाजात 2023-24 मध्ये भारताचा जीडीपी 7.1 टक्के राहील असे म्हटले होते. मात्र सुधारीत अंदाजामध्ये आर्थिक वृद्धीदरात 0.2 टक्क्यांच्या घटीचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पुढील आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर हा 6.9 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2024-25 साली 4.8 टक्के जीडीपीचा अंदाज
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताचा आर्थिक वृद्धी दर कसा असेल याबाबतचा पुढील तीन वर्षांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुधारीत अंदाजानुसार चालू वर्षी भारताचा जीडीपी 8.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये भारताचा जीडीपी 6.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 4.8 टक्के राहू शकतो असे आंतरराष्ट्रीय नाणे निधीने म्हटले आहे. पूर्वी वर्तवण्यात आलेल्या अंदाजामध्ये 2024-25 मध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर 6.1 टक्के राहील असे म्हटले होते.
जागतिक बँकेचा अंदाज
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या जीडीपी घसरणीचे संकेत दिले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपाठोपाठ जागतिक बँकेने देखील आर्थिक वृद्धी दराबाबत आपला सुधारित अंदाज व्यक्त केला आहे, सुधारित अंदाजात भारताच्या जीडीपीमध्ये पुढील काही वर्ष घसरण होऊ शकते असे म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8 टक्क्यांपर्यंत राहू शकतो असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाचा जागतिक आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असल्याचे देखील जागतिक बँकेने म्हटले आहे.
संबंधित बातम्या
CNG rates hike : पुणेकरांना पंधरा दिवसांत दुसरा धक्का, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवे दर