अयोध्येत श्रीराम भक्तांसाठी मोठमोठ्या कंपन्यांची फिल्डींग, अंबानी-अदानीपासून सर्वांची होणार चांदी

अयोध्येत अलिकडेच आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाले आहे. केंद्र सरकारने अयोध्येला जाण्यासाठी वंदेभारत एक्सप्रेससारख्या प्रिमियर गाड्या देखील सुरु केल्या आहेत. येथे ब्रॅंडींग आणि मार्केटींगची मोठी संधी पाहून मोठ मोठ्या कंपन्यांनी कंबर कसली आहे. कोकाकोलापासून बिसलरी, तर हाजमोलापासून ते पार्ले कंपन्या आणि अंबानी-अदानी यांच्या कंझ्युमर कंपन्यांनी आपली व्हीजिबिलिटी दर्शविण्यासाठी ही संधी न दवडण्याचा निर्णय घेतला आहे.

अयोध्येत श्रीराम भक्तांसाठी मोठमोठ्या कंपन्यांची फिल्डींग, अंबानी-अदानीपासून सर्वांची होणार चांदी
AMBANI ADANI Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 5:45 PM

अयोध्या | 18 जानेवारी 2024 : अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना जसजशी जवळ येत चालली आहे. तसतशी अयोध्यानगरीत भक्तांच्या सोबतच आता उद्योगांची देखील लगबग सुरु झाली आहे. मोठ मोठ्या कंपन्यांना या सोहळ्यानंतर अयोध्यानगरीत सुरु होणाऱ्या विकास कामात मोठी गुंतवणूक संधी दिसू लागली आहे. केवळ 3.5 लाख लोकसंख्येचे हे शहर राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सजले आहे. राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यानंतर सुमारे दहा लाख भक्त येथे पोहचण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिकांना येथे मोठी व्यवसायाची संधी दिसत आहे.

मोफत हाजमोला वाटप

डाबर ग्रुपने आपला पॉप्युलर ब्रॅंड ‘हाजमोला’ ला प्रमोट करण्यासाठी अनोखी रणनीती आखली आहे. 22 डिसेंबर 2024 च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जेथे जेवणाची आणि भंडाऱ्याची व्यवस्था असेल तेथे हाजमोला कंपनी आपले प्रोडक्ट मोफत वाटणार आहे. तसेच हाजमोला कंपनी अयोध्येतील तुलसी उद्यानात एक एक्सपीरियंस सेंटर तयार करीत आहे. येथे डाबर कंपनीचे अन्य उत्पादने उदा. ऑईल, हर्बल टी, रियल ज्यूस आदींचा वापर करु शकणार आहेत. डाबरने लखनऊ, वाराणसी आणि गोरखपुरहून अयोध्या येणाऱ्या महामार्गावर असणाऱ्या ढाब्यांशी देखील करार केला आहे. कंपनी येथे आपले नाव झळकून जाहीरात व्हावी यासाठी बिलबोर्डपासून शेल्फला नवीन ब्रॅंडींग करीत आहे.

कोकाकोला लॉंच केली ‘मंदिर थीम’

कोकाकोला कंपनीने देखील राम मंदिराची थीम लॉंच केली आहे. आतापर्यंत कोकाकोला आपल्या ब्रॅंडींगसाठी नेहमी लाल रंगाचा वापर करीत होती. परंतू आता कंपनी ब्राऊन रंगाचा थीमसाठी वापर केला आहे. राम मंदिराला जाणाऱ्या मार्गांवर कंपनीने 50 हून अधिक वेंडींग मशिन लावल्या आहेत. आणखी 50 वेंडींग मशिन लावण्यासाठी तयारी सुरु आहे. अयोध्येतील दुकानात नवीन बिलबोर्ड आणि कुलर्सलाही बाजारात कंपनीने उतरविले आहे.

अंबानी आणि अदानी उतरले बाजारात

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंज्युमर प्रोडक्ट्स लि. आणि गौतम अदानी यांच्या फॉर्च्युन ब्रॅंडने यांनी देखील अयोध्येत ब्रॅंडींगची जोरदार तयारी केली आहे. रियालन्सने आपल्या कॅंपाकोला ब्रॅंडची मार्केटींग केले आहे. तसेच इंडिपेंडेंस ब्रॅंडला देखील कंपनी प्रमोट करणार आहे. अदानी विल्मर आपल्या फॉर्च्युन ब्रॅंडचे प्रोडक्टचे ब्रॅंडींग करणार आहे. राम मंदिरच्या प्रसादाच्या सॅंपलद्वारे आपले प्रोडक्टला प्रमोट करीत आहे. आयटीसी मंगलदीप अगरबत्तीचीही अयोध्येत जाहीरात करीत आहे. कंपन्यांनी केवळ जाहीराती न करता आपले कियोस्क देखील जागोजागी बसवित आहे. याशिवाय कंपन्यांनी शरयू किनारी चेंजिंग रुम देखील तयार केले आहे.

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.