अदानी ग्रुपचं मोठं पाऊल, 48 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार!

नोएडा प्राधिकरणाने  अदानी एन्टरप्राईजेस (Adani Enterprises) आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजसह (Dixon Technologies) 13 कंपन्यांना नोयडा विभागातील औद्योगिक जमीन दिली आहे.

अदानी ग्रुपचं मोठं पाऊल, 48 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार!
अदानी एन्टरप्राईजेस
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 12:37 PM

मुंबई : नोएडा प्राधिकरणाने  अदानी एन्टरप्राईजेस (Adani Enterprises) आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजसह (Dixon Technologies) 13 कंपन्यांना नोयडा विभागातील औद्योगिक जमीन दिली आहे. या पुढाकारामुळे नोएडा विभागात 3,870 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सेक्टर 80 मधील 39,146 चौरस मीटर जमीन प्रस्तावित डेटा सेंटरसाठी अदानी एंटरप्राईजेस देण्यात आली आहे. कंपनी नोएडामध्ये 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल अशी अपेक्षा आहे.’(Adani Enterprises and  12 other companies get industrial land in Noida)

प्राधिकरणाने सांगितले की,  याठिकाणी अदानी एंटरप्रायजेस एक डेटा सेंटरची स्थापना करेल. ज्यामुळे केवळ या क्षेत्रात वाढ होणार नाही, तर रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. प्राधिकरणाने 4,000 चौरस मीटरपेक्षा जास्त आकाराच्या औद्योगिक भूखंडांच्या वाटपासाठी प्रस्ताव मागवले होते. त्यासाठी यावर्षी फेब्रुवारीमध्ये अर्जप्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या आणि बुधवारी याचा निकाल जाहीर झाला.

या 13 कंपन्यांना मिळाली जमीन

निवेदनात म्हटले आहे की, 60 हून अधिक कंपन्यांनी जागेसाठी अर्ज केला होता आणि त्यापैकी केवळ 13 पात्र कंपन्यांना या भूखंडाचे वाटप करण्यात आले. याशिवाय ‘डिक्सन टेक्नोलॉजीज’ (Dixon Technologies), ‘अग्रवाल असोसिएट्स’ (Agarwal Associates), ‘वेव्हटेक्स प्रोजेक्ट्स’ (Weavetex Projects), ‘एन्क्वाइन टेक न्यूट्री केअर एलएलपी’ (Enquine Tech Nutri Care LLP), ‘आरएएफ मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ (RAF Manufacturing Company), ‘रोटो पंप्स’ (Roto Pumps), ‘केके फ्रेगरेन्स’ (K K Fragrances), ‘सावी लेथर्स’ (Savi Leathers), ‘मिठास स्वीट्स आणि रेस्टॉरंट्स’ (Mithaas Sweets and Restaurants), ‘अ‍ॅडोरॅक्स’ (Adoratex), ‘वेस्टवे इलेक्ट्रॉनिक्स’ (Westway Electronics) आणि ‘धम्मपुर अल्को केम’ (Dhampure Alco Chem) यांना हा भूखंड वाटप करण्यात आला आहे (Adani Enterprises and  12 other companies get industrial land in Noida).

‘या’ क्षेत्रांमधील भूखंड वाटप करण्यात आले

नोएडा प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रितू माहेश्वरी यांच्या मान्यतेनंतर सेक्टर 80, 145, 140 ए आणि 151 मधील एकूण 1,99,848 चौरस मीटर भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे.

48 हजाराहून अधिक रोजगार संधी निर्माण होण्याचा अंदाज

या निवेदनात असे म्हटले आहे की, नोएडा प्राधिकरणला या भूखंड वाटपांमधून 344 कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. यामुळे नोएडा विभागात 3,870 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल आणि 48 हजारांहून अधिक नोकरीच्या संधी निर्माण होतील.

(Adani Enterprises and  12 other companies get industrial land in Noida)

हेही वाचा :

सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी! EPF मधील पैशांमध्ये मोठ्या वाढीची शक्यता

मोठी बातमी! आता रेमडेसिव्हीरची कमतरता भासणार नाही, 4 मोठ्या औषध कंपन्यांचा दावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.