Hidenburg Gautam Adani : हिंडनबर्गचा वार खोलवर! 20 दिवसांतच गौतम अदानी यांच्या साम्राज्याला तडे

Hindenburg Gautam Adani : हल्लाच एवढ्या ताकदीने झाला आहे की, पडझड तर होणारच होती. यामुळे गौतम अदानी यांच्या एकूण संपत्ती मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये दुसऱ्या क्रमांकावरील अदानी थेट 24 व्या क्रमांकावर फेकले गेले.

Hidenburg Gautam Adani : हिंडनबर्गचा वार खोलवर! 20 दिवसांतच गौतम अदानी यांच्या साम्राज्याला तडे
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 7:18 PM

नवी दिल्ली : अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg Report) एका तडाख्यामुळे गौतम अदानी (Gautam Adani) यांचे साम्राज्य चक्रीवादाळातील पालापोचळ्याप्रमाणे उडाले. या साम्राज्याला मोठे हादरे बसले. अदानी समूहात भयकंपावरुन भूकंप आला. हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समूहाशी संबंधित 88 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये (Share) प्रचंड पडझड झाली. गुंतवणूकदारांनी शेअर विक्रीचा जणू सपाटाच लावला. या अहवालात गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीतही मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये (Bloomberg Billionaires Index) दुसऱ्या क्रमांकावरील अदानी थेट 24 व्या क्रमांकावर फेकले गेले. अदानी यांची एकूण संपत्ती घसरुन 51.5 अब्ज डॉलरवर थांबली.

शेअर बाजारात सुचीबद्ध अदानी समूहाच्या 7 प्रमुख कंपन्यांनी 85 टक्के मूल्य वाढविले असल्याचा दावा हिंडनबर्गच्या अहवालात करण्यात आला होता. हिंडनबर्गचा हा अहवाल 24 जानेवारी 2023 रोजी सार्वजनिक करण्यात आला. रिपोर्टनुसार, अदानी ग्रुपच्या शेअरचे भाव खऱ्या किंमतीपेक्षा 85 टक्के अधिक दाखविण्यात आले आहेत. म्हणजेच 15 रुपयाचा शेअर अदानी समूहाने 100 रुपये दाखविल्याचा आरोप हिंडनबर्गच्या अहवालात करण्यात आला होता.

या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअरवर संकट कोसळले. 24 जानेवारीपासून या शेअरमध्ये सातत्याने पडझड सुरु आहे. ही घसरण कायम आहे. अदानी समूहाचे शेअर 70 टक्के घसरले आहेत. कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 80 टक्के घसरले आहेत. म्हणजेच हे महागडे शेअर आता त्यांच्या खऱ्या किंमतीवर आल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

अदानी ग्रीन एनर्जी शेअरला 15 फेब्रुवारी रोजी 5 टक्क्यांचे लोअर सर्किट लागले आहे. या शेअरचा एका वर्षातील उच्चांकी स्तर 3050 इतका होता. गेल्या वर्षी एप्रिल, 2022 मध्ये हा उच्चांक गाठला होता. त्यानंतर आता अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 80 टक्क्यांची घसरण झाली. एकेकाळी वाऱ्यावर स्वार असलेले हे शेअर आता जमिनीवर उतरले आहेत.

अदानी पॉवरचा शेअर घसरुन 140.80 रुपयांवर आला आहे. शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 67.44 टक्के घसरला आहे. हा शेअर एका वर्षापूर्वी 432.80 रुपये होता. अदानी विल्मर हा एका वर्षापूर्वीच्या उच्चांकापेक्षा 56 टक्के घसरला आहे. अदानी इंटरप्राईजेसचे शेअर 58 टक्के घसरले आहेत. या शेअरचा शेअर 52 आठवड्यांचा उच्चांक 4,189.55 रुपये होता. अदानी पोर्टचा शेअर एका वर्षात 43 टक्के घसरला.

अदानी समूहाला फ्रांसच्या टोटल एनर्जीज या कंपनीने मोठा झटका दिला आहे. अदानी समूहात या विदेशी गुंतवणूकदाराने मोठ्या गुंतवणुकीची तयारी केली होती. हायड्रोजन प्रोजेक्टसाठी अदानी समूहासोबत 50 अब्ज डॉलरचा प्रस्ताव कंपनीने राखीव ठेवला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.