Adani NDTV | NDTV मध्ये अदानी ग्रुपची हिस्सेदारी, 29.18 टक्के वाटा खरेदी करणार, कंपनीची खुली ऑफर

Adani NDTV | अदानी समूहाच्या कंपनीने NDTV मधील 26 टक्के हिस्सा विकत घेण्याची खुली ऑफर दिली आहे. AMG Media Networks NDTV मधील 29.18 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची बातमी ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. AMG Media Networks ही कंपनी अदानी समूहाची आहे.

Adani NDTV | NDTV मध्ये अदानी ग्रुपची हिस्सेदारी, 29.18 टक्के वाटा खरेदी करणार, कंपनीची खुली ऑफर
एनडीटीव्हीत हिस्सेदारीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 7:19 PM

Adani NDTV | देशातील मीडियासह सर्वसामान्यांना आज एका बातमीने धक्का दिला आहे. या बातमीची खमंग चर्चा रंगली आहे. बातमी मीडियासंबंधीची आहे. अदानी समूहाच्या मीडिया (Adani Group) कंपनीने मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड म्हणजेच NDTV मधील 29.18 टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली. अदानी समूहाच्या कंपनीने NDTV मधील 26 टक्के भागभांडवल विकत घेण्याची खुली ऑफर दिल्याचेही चर्चा रंगली आहे. अदानी समूहाने स्वतंत्र 26% हिस्सा खरेदी करण्यासाठी खुली ऑफर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. AMG मीडिया नेटवर्क लिमिटेड (AMNL) च्या मालकीची उपकंपनी, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) हा टेकओव्हर करणार आहे. अप्रत्यक्षरीत्या ही डील अदानी समुहासाठी करण्यात येणार आहे. ही कंपनी एनडीटीव्हीतील 29.18 टक्के भागभांडवल संपादन करण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) च्या मालकीची आहे.

एनडीटीव्हीतील सहभागीदार कंपनीची खरेदी

आरआरपीआर ही एनडीटीव्हीची प्रवर्तक समूह कंपनी आहे. एनडीटीव्हीमध्ये या कंपनीचा 29.18 टक्के हिस्सा आहे. AMNL ची संपूर्ण मालकी VCPL कडे आहे. आता या VCPL कडे आरआरपीआरच्या मालकीसंबंधीचे वॉरंट आहे. त्याआधारे या कंपनीला आरआरपीआरमधील 99.99% भागीदारीत रूपांतरित करण्याचा अधिकार मिळाला आहे. आता एनडीटीव्हीतील हिस्सा मिळवण्यासाठी व्हीसीपीएलने आरपीआरमधील 99.5% हिस्सा मिळविण्यासाठी वॉरंटचा वापर केला आहे. अशा अधिग्रहणामुळे VCPL कंपनीला RRPR चे नियंत्रण मिळवता येणार आहे.

सेबीच्या परवानगीने खरेदीची प्रक्रिया

याविषयी अदानी समुहाने एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार, आरआरपीआर ही एनडीटीव्हीची प्रवर्तक समूह कंपनी असून एनडीटीव्हीमध्ये तिचा 29.18 टक्के हिस्सा आहे. व्हीसीपीएल, एएमएनएल आणि एईएल सह, सेबीच्या (शेअर्सचे अधिग्रहण) नियम, 2011 च्या आवश्यकतांचे पालन करून एनडीटीव्हीमधील 26% पर्यंतचा हिस्सा खरेदी करण्यासाठी एक खुली ऑफर देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

85 कोटींचा निव्वळ नफा

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात एनडीटीव्हीविषयी लेखाजोखा मांडण्यात आला आहे. त्यानुसार, एनडीटीव्ही हे देशातील एक अग्रगण्य मीडिया हाऊस आहे. ज्याने तीन दशकांहून अधिक काळ विश्वासार्ह बातम्या दिल्या आहेत. ही कंपनी एनडीटीव्ही 24×7 या तीन राष्ट्रीय वृत्तवाहिन्या चालवते. एनडीटीव्ही इंडिया आणि एनडीटीव्ही प्रॉफिटची ऑनलाईन मीडियातही दमदार कामगिरी आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचे मिळून देशभरात 35 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स समाज माध्यमांवर आहेत. एनडीटीव्हीवर कर्ज असेल तरी ते नगण्य आहे. हे आर्थिक वर्ष 2022 मध्ये 123 कोटी रुपयांच्या ईबीआयटीडीएसह 421 कोटी रुपयांचा महसूल या समुहाला मिळाला असून त्यात 85 कोटी रुपयांचा निव्वळ नफा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.