अदानी समूहाला सेबीचा दणका; या 6 कंपन्यांना पाठवली नोटीस, कारण तरी काय
उद्योगपति गौतम अदानी यांच्या 6 कंपन्यांना बाजार नियंत्रक सेबीने नोटीस पाठवली आहे. हिंडनबर्गचे भूत नेमकेच मानगुटीवरुन उतरले. पण आता ही नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासंबंधीच्या काही शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा मागविण्यात आला आहे.
देशातील दुसरे श्रीमंत उद्योजक आणि अब्जाधीश गौतम अदानी यांना एक मोठा झटका बसला आहे. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्गचे भूत कंपनीच्या मानगुटीवरुन नुकतेच उतरले आहे. आता बाजार नियंत्रक SEBI ने या समूहातील 6 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये कंपन्यांना शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासंबंधीच्या काही शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा मागविण्यात आला आहे.
या नियमांचे केले उल्लंघन
सेबीने नोटीस पाठवली. त्यात कारण पण देण्यात आले आहे. त्यानुसार कंपन्यांनी रिलेटेड पार्टी व्यवहारांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. रिलेटेड पार्टी व्यवहार म्हणजे यापूर्वी दोन कंपन्यांनी आप-आपसात केलेला व्यवहार, दोन कंपन्यांमध्ये पूर्वीपासूनच व्यवहार होत असल्यास त्याला रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन म्हणतात.
या कंपन्यांना मिळाली नोटीस
- सेबीने अदानी ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्राईजेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. याशिवाय अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्यूशन्स, अदानी विल्मर आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. शेअर बाजारात या समूहातील एकूण 10 कंपन्या सूचीबद्ध आहेत.
- अदानी एंटरप्राईजेसला दोन नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. कंपनीच्या कायदेशीर सल्लागारानुसार, या नोटीसचा कंपनीवर फार मोठा परिणाम होणार नाही. सेबीच्या नोटीसमध्ये समूहातील कंपन्यांच्या काही व्यवहारांची माहिती विचारली आहे. ही माहिती कंपन्यांच्या आर्थिक ताळेबंदात दिसून न आल्याने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी इतर माहिती देण्यास कंपनीने नकार दिला.
हिंडनबर्गचे काय कनेकन्शन?
गेल्यावर्षी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चच्या एका अहवालाने अडाणी समूहात मोठा भूकंप आला होता. सर्वोच्च न्यायालयाने सेबीला या प्रकरणात अदानी समूहातील कंपन्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सेबीने ऑगस्ट महिन्यात याविषयीचा एक अहवाल सादर केला होता. त्यातील 17 रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनची चौकशी करण्यात आली. त्याचा संबंध हिंडनबर्गच्या अहवालाशी होता. अदानी हे भारतातील दुसरे श्रीमंत उद्योजक आहे. Bloomberg Billionaire Index नुसार, त्यांची एकूण संपत्ती 99 अब्ज डॉलरहून अधिक आहे.