अदानी ग्रुपनं गुंतवणुकदारांच्या विश्वासासाठी पाऊलं उचलली; नेमके काय केले आहेत उपाय…
पुढील आठवड्यात बँकांच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी समूहाने बार्कलेज, बीएनपी परिबा, डीबीएस बँक, ड्यूश बँक, एमिरेट्स एनबीडी कॅपिटल, आयएनजी, आयएमआय-इंटेसा सॅनपाओलो, एमयूएफजी, मिझुहो, एसएमबीसी निक्को आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांनाही आमंत्रणे देण्यात आली आहेत.
नवी दिल्लीः अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समुहाला जोरदार धक्का बसला आहे. कंपन्यांच्या घसरणाऱ्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांचा अदानी समुहावरील विश्वासही उडत चालला आहे. त्यामुळे आता अदानी समूह गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अदानी समूह गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी निश्चित उत्पन्नाचा रोड शो आयोजित करण्याचीही मोठी योजना आखण्याच्या तयारीत आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समुहाच्या व्यवसायाबरोबरच त्यांच्या इमेजचे मोठे नुकसान झाले आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार 27 फेब्रुवारी रोजी सिंगापूरमध्ये रोड शो होणार असून त्यामध्ये अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगशिंदर सिंह सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोड शोनंतर, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी हाँगकाँगमध्ये याच प्रकारच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात बँकांच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी समूहाने बार्कलेज, बीएनपी परिबा, डीबीएस बँक, ड्यूश बँक, एमिरेट्स एनबीडी कॅपिटल, आयएनजी, आयएमआय-इंटेसा सॅनपाओलो, एमयूएफजी, मिझुहो, एसएमबीसी निक्को आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांनाही आमंत्रणे देण्यात आली आहेत. .
अमेरिकेच्या शॉर्ट सेलिंग हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर शेल कंपन्यांच्या माध्यमातून शेअर्समध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचाही आरोप केला आहे.
तर 24 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे अदानीच्या शेअर्समध्ये मोठी उलथापालथ झाली. यामुळे, काही कंपन्यांचे बाजार भांडवल (Mcap) सुमारे 60-70 टक्क्यांनी घसरले आहे.
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील सात सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात सुमारे 140 अब्जांचे नुकसान झाले आहे. मात्र, अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.
अदानी समुहाकडून गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काही प्रयत्न करत असल्याची ही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वीही अदानी समुहाने सांगितले होते की कंपनीची मजबूत परिस्थिती असून कंपनीची व्यवसाय योजनाही पूर्णपणे निधीची असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांच्या चिंता दूर करण्याच्या प्रयत्नात अदानी समुहाने पहिल्यांदा बाँडधारकांशी चर्चा केली होती, जिथे समूह अधिकार्यांनी कंपनीच्या काही युनिट्सचे पुनर्वित्त केले आहे. तर कंपन्यांना सर्व सुरक्षित कर्जं पूर्णतः अदा केली असून त्या त्या योजनांवर चर्चा करण्यात आली आहे.
हिंडेनबर्गने अदानी समूहावरील संशोधन अहवाल 24 जानेवारी रोजी सादर केला होता, ज्यामध्ये शेअर्स आणि कर्जाच्या फेरफारबाबत मोठे दावे करण्यात आले होते.
हा अहवाल आल्यानंतर अदानीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अदानी समूहाचे बाजार भांडवल 12 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आणि ते 100 अब्जच्या खालीही पोहोचले होते.