गोऱ्या साहेबांच्या देशात Adar Poonawalla यांचा महल, इतक्या हजार कोटींची झाली डील

Adar Poonawalla | भारताचा व्हॅक्सीन प्रिन्स अदर पुनावाला याने मेगा डील केली आहे. त्याने लंडनमध्ये आतापर्यंतचा सर्वात महागडा सौदा केला आहे. त्याने एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. ही आतापर्यंतची सर्वात महागडी डील असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये पुनावाला यांनी मोजले आहे.

गोऱ्या साहेबांच्या देशात Adar Poonawalla यांचा महल, इतक्या हजार कोटींची झाली डील
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 10:01 AM

नवी दिल्ली | 13 डिसेंबर 2023 : भारताचा ‘Vaccine Prince’ अदर पुनावाला याने लंडनमध्ये महागडे आलिशान घर खरेदी केले आहे. फायनेन्शिअल टाईम्सने याविषयीचे वृत्त दिले आहे. कोरोनावर प्रभावी कोविशील्ड व्हॅक्सीन तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदर पुनावाला सीईओ आहेत. पुनावाला यांनी लंडनमध्ये सर्वात महागडे घरं खरेदी केले आहे. या करार जवळपास 1446 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला आहे. 25,000 चौरस फुटावर पुनावाला यांचा हा महल आहे. एबरकोनवे हाऊस हाईड पार्कच्या जवळ हा बंगला 1920 मध्ये बांधण्यात आला होता. हे घर पोलंडचे सर्वात श्रीमंत उद्योगपती जॉन कुलजिक यांच्या मालकिचे आहे. त्यांची मुलगी डोमिनिका कुलजिक यांच्या सहमतीने त्यांनी घर खरेदी केले.

मोठी हवेली

सूत्रांच्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची इंग्लंडमधील सहायक कंपनी सीरम लाईफ सायंसेज ही मालमत्ता खरेदी करणार आहे. हे घर लाल विटांचे आहे. हेनरी डंकन मॅकलेरन, बॅरन एबरकोनवे या व्यावसायिकांच्या नावाआधारे या घराचे नाव ठेवण्यात आले आहे. या दोघांनी मिळून हा ग्रोसवेनर स्केअर महल तयार केला.

हे सुद्धा वाचा

कंपनीचे गेस्ट हाऊस

या आलिशान बंगल्यात कंपनीचे गेस्ट हाऊस पण तयार करण्यात आले आहे. त्याठिकाणी विविध कार्यक्रम, बैठकी, इव्हेंट घेण्यासाठी जागा तयार करण्यात आली आहे. हा सौदा युरोपियन संघाच्या चलनात 138 दशलक्ष युरोत ठरला आहे. हा लंडनमधील दुसरा सर्वात मोठा महागडा सौदा ठरला आहे. जानेवारी 2020 मध्ये पहिला सर्वात महागडा सौदा झाला होता. त्यावेळी आलिशान घरासाठी 210 दशलक्ष युरो मोजण्यात आले होते.

लंडनच्या रिअल इस्टेटमध्ये भारतीयांचा दबदबा

इंग्लंडच्या प्रमुख विकासकांपैकी एक Barratt London ने लंडन रिअल इस्टेटसंदर्भात जवळपास एक वर्षांपूर्वी एक अहवाल तयार केला. या अहवालातील आकडेमोड आता समोर आली आहे. या अहवालाने हा गौप्यस्फोट केला आहे. त्यानुसार, लंडन प्रॉपर्टी मार्केटमध्ये भारतीयांचे प्राबल्य वाढले आहे. Barratt London नुसार, रिअल इस्टेटमध्ये भारतीयांनी इंग्रजांना मात दिली आहे. मालमत्तांच्या मालकी बाबत इंग्रजापेक्षा भारतीय सर्वात पुढे आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.