राजकीय पक्षांच्या निधीत भाजप अव्वल, काँग्रेस, राष्ट्रवादी कितव्या स्थानी

असोसिएशन फॉर डॅमोक्रेटिक रिफॉर्म्सने (एडीआर) राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2016-17 आणि 2017-18 मध्ये राष्ट्रीय पक्षांना एकूण 1059.25 कोटी निधी मिळाला.

राजकीय पक्षांच्या निधीत भाजप अव्वल, काँग्रेस, राष्ट्रवादी कितव्या स्थानी
Follow us
| Updated on: Jul 09, 2019 | 5:32 PM

नवी दिल्ली: असोसिएशन फॉर डॅमोक्रेटिक रिफॉर्म्सने (एडीआर) राजकीय पक्षांना मिळालेल्या निधीबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2016-17 आणि 2017-18 मध्ये राष्ट्रीय पक्षांना एकूण 1059.25 कोटी निधी मिळाला. त्यापैकी एकट्या भाजपला सर्वाधिक 915.59 कोटींचा निधी मिळाला. हा वाटा एकूण निधीच्या 86 टक्के एवढा आहे.

राजकीय पक्षांना मिळालेल्या एकूण निधीपैकी 93 टक्के निधी (985.18 कोटी) कॉर्पोरेट घराण्यांकडून मिळाला आहे. निधी मिळालेल्या पक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), इंडियन नॅशनल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) CPM, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (AITC) या पक्षांचा समावेश आहे. सातवा राष्ट्रीय दल बहुजन समाज पक्षाने (BSP) 2004 नंतर या आर्थिक वर्षांमध्ये पक्षाला 20 हजारपेक्षा अधिकचे दान मिळाले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बसपला विश्लेषणातून वगळ्यात आले आहे.

भाजपला एकूण 1731 कॉर्पोरेट घराण्यांनी 915.59 कोटी रुपये दान केले. दुसरीकडे काँग्रेसला एकूण 151 कॉर्पोरेट घराण्यांनी 55.36 कोटी रुपये दान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण 23 कॉर्पोरेट घराण्यांनी 7.73 कोटी रुपयांचा निधी दिला. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये राजकीय पक्षांना सर्वाधिक ज्यास्त 573. 18 कोटी रुपयांचा निधी मिळाला. वर्ष 2016-17 मध्ये हाच निधी 563.17 कोटी आणि वर्ष 2017-18 मध्ये 421.99 कोटी होता.

वर्ष 2012-13 पेक्षा वर्ष 2017-18 मध्ये राजकीय पक्षांना कार्पोरेट घराण्यांकडून मिळणाऱ्या निधीत 414 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक वाटा (1621.40 कोटी) भाजपला गेला आहे. त्यामुळे अनेक तज्ञ चिंताही व्यक्त करत आहेत. क्राऊड फंडिंग ऐवजी केवळ धनाढ्यांकडून एका विशिष्ट पक्षाला होणारा विषम निधी वाटप आरोग्यदायी लोकशाहीला मारक असल्याचाही सूर निघत आहे. तसेच संसाधनांचे विषम वाटप झाल्यास राजकीय पक्षांना न्याय्य लढत देणेही कठीण होईल, असंही मत व्यक्त होत आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.