नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : जर जगातीस सर्वात मजबूत चलन म्हटले की आपल्याला अमेरिकन डॉलरकडे पहावे लागते. पौंड, युरो आणि दिनारबाबतही तुम्ही विचार करु शकता. परंतू ज्या देशाच्या चलनाने अक्षरश: अमेरिकन डॉलरलाही या तिमाहीत कामगिरीत मागे टाकलंय, त्या देशाचे नाव ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. सगळ्या देशांच्या करन्सीला मागे टाकत आपल्या शेजारील देशाच्या या चलनाने नंबर वन पटकावला आहे.
आपला शेजारील नेहमी युद्धग्रस्त असलेल्या आणि तालिबानी शासन असलेल्या अफगाणिस्तानने ही कमाल केली आहे. ब्लुमबर्गच्या अहवालानूसार अफगाणिस्तानचे चलन सप्टेंबर तिमाही दरम्यान जगातील सर्वात चांगली कामगिरी करणारे चलन ठरले आहे. परंतू 26 सप्टेंबरच्या आकड्यानूसार डॉलरच्या तुलनेत अफगाणी चलनाचे व्हॅल्यू 78.25 इतके आहे. म्हणजेच एका डॉलर म्हणजे 78.25 अफगानीच्या व्हॅल्यूबरोबर आहे.
भारतीय रुपयाचा विचार केला डॉलरच्या तुलनेत रुपया 83.27 वर आहे. म्हणजे एक डॉलरसाठी 83.27 रुपये मोजावे लागतील. म्हणजे अफगाणीची किंमत सध्या भारतीय रुपयांपेक्षा किंचित जादा आहे. विनिमय दरानूसार एक अफगानी मध्ये 1.06 भारतीय रुपये येतील. अफगाणिस्तानचे चलन मजबूतीचे कारण म्हणजे तालिबानी शासनाने चलन मजबूतीसाठी केलेले प्रयत्न आणि दुसरे कारण तालिबानी राजवटीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे जगभरातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीमुळे अफगाणी करन्सीची किंमत वाढली आहे.
सप्टेंबरच्या तिमाहीत अफगाणिस्तानचे चलन अफगाणीच्या किंमतीत 9 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ जगातील कोणत्याही चलनाच्या तुलनेत जादा आहे. ब्लुमबर्गच्या आकड्यानूसार सप्टेंबरच्या तिमाहीत कोलंबियाच्या करन्सी पेसो दुसऱ्या क्रमांकावर आहे. या तिमाहीत पेसोचा भाव 3 टक्के वाढला आहे. वार्षिक कामगिरीचा विचार केला तर गेल्या एक वर्षांतील सर्वात मजबूत करन्सी पेसो आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकाचे चलन आहे. आणि या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर अफगाणी चलन आहे.