Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर, अदानी यांचा वाजणार डंका, मस्क यांचा नंबर लवकरच होणार कट?
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत उद्योजक मुकेश अंबानी मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत आहेत..
नवी दिल्ली : अदानी समुहाचे मालक आणि जगातील तिसरे सर्वात श्रीमंत, अरबपती गौतम अदानी (Gautam Adani) श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या संपत्तीत दिन दुनी, रात चौगुनी भर पडत आहे. गेल्या वर्षी अदानी यांच्या संपत्तीत 44 अरब डॉलरची भर पडली. जागतिक श्रीमंतांच्या यादीत (Millionaires List) अदानी यांनी गरुड झेपच घेतली नाही तर अनेकांना धोबीपछाड दिली आहे. आता एलॉन मस्क (Elon Musk) यांचा या यादीतील दुसरा क्रमांक धोक्यात आला आहे. अदानी लवकरच त्यांची जागा घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
टेस्लाचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने घसरण होत आहे. अदानी आणि मस्क यांच्या संपत्तीतील चढउतार पाहता, येत्या काही दिवसांत अदानी मोठा उलटफेर करण्याच्या तयारीत आहेत. मस्क यांनी 2022 मध्ये जेवढी संपत्ती गमावली. त्यातील अर्धा हिस्सा अदानी यांनी एका वर्षातच कमावला आहे.
अरबपती गौतम अदानी यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वृद्धी होत आहे. त्यांची संपत्ती रॉकेटच्या गतीने वाढत आहेत. याच वेगाने अदानी यांची संपत्ती वाढली तर ते लवकरच मस्क यांचे दोन नंबरचं पद हिसकावतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
एक वर्षापेक्षा अधिक काळ एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक पहिला होता. काही दिवसांपूर्वी मस्क यांच्या संपत्तीत घसरण झाल्याने या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आले. आता त्यांचा यादीतील क्रमांक आणखी घसरण्याची शक्यता आहे.
मस्क यांची सध्या एकूण 137 अरब डॉलर इतकी संपत्ती आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांची एकूण संपत्ती 340 अरब डॉलर होती. ट्विटरच्या मालकीतील खटाटोप मस्क यांना चांगलाच महागात पडला. त्यांची संपत्ती घसरली. सध्या अदानी यांची एकूण संपत्ती 121 अरब डॉलर आहे.
एकाच वर्षात अदानी यांनी 44 अरब डॉलरची कमाई केली आहे. तर मस्क यांना याच काळात 133 अरब डॉलरचे नुकसान झाले आहे. जर मस्क यांच्या घराचे वाशे अजून फिरले तर अदानी दुसऱ्या क्रमांकावर ते झेप घेतील.
एका अंदाजानुसार, अदानी हे येत्या पाच आठवड्यात जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात. सध्या मस्क यांच्या संपत्तीत झपाट्याने घसरण होत असून ते प्रत्येक दिवशी जवळपास 2,500 कोटी रुपये गमवत आहेत. तर अदानी प्रत्येक दिवशी कमाईचा नवा उच्चांक गाठत आहेत.