रामदेव बाबा (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही त्यांचा नॉन-फूड व्यवसाय विक्री करण्याच्या तयारीत आहे. टूथपेस्ट, तेल, साबण आणि शॅम्पूचा व्यवसाय विक्रीची तयारी करण्यात येत आहे. बाबा रामदेव यांची शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपनी
पतंजली फूड्स लिमिटेड (Patanjali Foods Limited) हीच हा व्यवसाय खरेदी करणार आहे. तसा प्रस्ताव देण्यात आला आहे. कंपनीने शेअर बाजाराला या घडामोडींची माहिती दिली आहे. त्यानुसार, पतंजली आयुर्वेद लिमिटेडचा नॉन-फूड बिझनेसची विक्री करण्याविषयीचा प्रस्ताव मिळाला आहे. पतंजलीच्याच दोन कंपन्यांमध्ये खरेदी-विक्रीचा हा योग जुळून आला आहे.
आता होणार मूल्यांकन
कंपनीच्या बोर्डाने 26 एप्रिल रोजी या प्रस्तावावर चर्चा केल्याचे सांगितले आहे. पतंजली फूड्स लिमिटेडनुसार, प्रस्ताव मूल्यांकनासाठी मंजूरी देण्यात आली आहे. पतंजली आयुर्वेदची स्थापना बाबा रामदेव यांनी केली होती. ते कंपनीचे प्रवर्तक आहेत. तर आचार्य बालकृष्ण या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. प्रवर्तक गटाची नॉन-फूड व्यवसायात 50 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
पतंजली फूडचा वाढता कारभार
खाद्यतेल तयार करणारी कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडला यापूर्वी रुची सोया इंडस्ट्रीज नावाने ओळखले जात होते. 2019 मध्ये बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेदने दिवाळखोरीच्या प्रकरणात ही कंपनी 4,350 कोटीत खरेदी केली होती.
पतंजली आयुर्वेदवरुन फटकारले