बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यानंतर धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने ब्युटी विथ ब्रेनची चुणूक दाखवली आहे. तिने फूड अँड ग्रोसरी डिलव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. तिने 345 रुपये प्रति शेअर प्रमाणे या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. स्विगीचा आयपीओ बाजारात येणार आहे. त्यापूर्वीच तिने या कंपनीचे 1.5 कोटी शेअर खरेदी करत हिस्सेदारी मिळवली आहे. स्विगीचा आयपीओ या वर्षी बाजारात येण्याची शक्यता आहे.
एकूण 3 लाखांची केली गुंतवणूक
माधुरी दीक्षित आणि इनोव 8 कंपनीचा संस्थापक रितेश मलिक या दोघांनी स्विगी कंपनीत ही गुंतवणूक केली आहे. दोघांनी मिळून दुय्यम बाजारात स्विगीचे शेअर्स खरेदी केले आहेत. दीक्षित आणि मलिक यांनी मिळून 3 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे. या दोघांनी प्रत्येकी दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्याच्या शेअरधारकांकडून या दोघांनी हे शेअर खरेदी केले आहेत.
वर्षा अखेरीस आयपीओ बाजारात
या वर्षाच्या अखेरीस स्विगीचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात स्विगीने याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण दिग्गज या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे समोर आल्यानंतर लवकरच आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. स्विगीचा आयपीओ 11,664 कोटी रुपयांचा असू शकतो. आयपीओ येण्यापूर्वीच अनेक दिग्गज या कंपनीत मोठी गुंतवणूक करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी?
या आर्थिक वर्षात स्विगीचा महसूल 11,247 कोटी रुपयांचा होता. गेल्या वर्षीपेक्षा महसूलात 36 टक्के अधिक वाढ नोंदवण्यात आली. वर्षभरापूर्वी कंपनीचा महसूली आकडा 8265 कोटी रुपये होता. कंपनीच्या तोट्याचा आकडा 44 टक्क्यांनी कमी झाला आहे. तो आता 2350 कोटी रुपयांवर आला आहे. या आर्थिक वर्षात स्विगीची स्पर्धक झोमॅटोने 12,114 कोटी रुपयांची कमाई केली. तर या कालावधीत झोमॅटोला 351 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. यंदा झोमॅटोच्या शेअरमध्ये 120 टक्क्यांची उसळी दिसून आली. आता स्विगीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.