Airlines Insolvency : या कंपनीचे विमान जमिनीवर! दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर फ्लाईट केल्या रद्द

Airlines Insolvency : किंगफिशरनंतर आता आणखी एका भारतीय विमान कंपनीचे विमान जमिनीवर आले आहे. दिवाळखोरीसंबंधीची प्रक्रिया सुरु होताच, कंपनीने सर्व फ्लाईट रद्द केल्या.

Airlines Insolvency : या कंपनीचे विमान जमिनीवर! दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर फ्लाईट केल्या रद्द
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 8:18 PM

नवी दिल्ली : भारतात विमान सेवेचे (Indian Airlines Services) आकाश फार मोठं आहे. अजून सर्वसामान्यांसाठी विमानाची चंगळ झालेली नाही. विमानाचे तिकीट सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर आहे. त्यामुळे अनेक शहरात एका ठराविक वेळीच अजून ही विमानांचे उड्डाण होते. काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असूनही त्याठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्यास तात्पुरते लँडिंग अथवा नाईट लँडिंगची व्यवस्थाच तेवढी करण्यात येते. भारतात अनेक विमान कंपन्यांनी प्रयोग करुन पाहिले. त्यात क्वचितच काहींना फायदा झाला. किंगफिशर (Kingfisher) सपाट झाल्यानंतर आता या भारतीय कंपनीचे विमान जमिनीवर आले आहे. दिवाळखोरीसंबंधीची प्रक्रिया सुरु होताच कंपनीने सर्व फ्लाईट रद्द केल्या आहेत.

Go First वाडिया समूहाची मालकी असलेली भारतीय विमान कंपनी गोफर्स्टने (Go First) मंगळवारी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) समोर ऐच्छिक दिवाळी प्रक्रियेचा अर्ज सादर केला. त्यासंबंधीच्या प्रक्रियेची परवानगी मिळण्यासाठी कंपनीने धाव घेतली आहे. गो फर्स्ट एअरलाईन्सचे सीईओ कौशिक खोना यांना याविषयीची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी, कंपनीने एअरलाईन्सची 3 आणि 4 मे रोजीची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांना याविषयीची माहिती देण्यात आली.

पैशांची निकड या विमान कंपनीला पैशांची निकड आहे. निधीची कमतरता सतत जाणवत असल्याने गो फर्स्ट कंपनीसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे. कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांच्या दाव्यानुसार, दिवाळी प्रक्रिया सुरु करण्यासाठी एनसीएलटीला अर्ज सादर करण्यात आला आहे. प्रँट आणि व्हिटनी यांच्याकडून इंजिनाची प्रक्रिया थंडावल्याने कंपनीचे जवळपास 28 विमाने उभी आहेत. यामुळे कंपनी अडचणीत आली आहे.

हे सुद्धा वाचा

Go First

कंपनीचे हितरक्षण कंपनीचे सीईओ खोना यांनी हा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगत, कंपनीचे हितरक्षण करण्यासाठी हा निर्णय भाग पडल्याचे सांगितले. केंद्र सरकारला एअरलाईन्ससंबंधी सर्व घडामोडींचा लेखाजोखा सादर करण्यात आला आहे. विमानन नियामक महानिदेशालय नागरिक उड्डयन (DGCA) यांच्याकडे कंपनी एक सविस्तर अहवाल सादर करणार आहे.

संकटमोचकाच्या शोध वाडिया समूहाची स्वामित्ववाली गो फर्स्ट एअरलाईन्स सध्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी संकटमोचकाच्या शोधात आहे. याविषयी संभावित गुंतवणूकदारांशी चर्चा सुरु आहे. सध्या ही एअरलाईन कंपनी कॅश अँड कॅरी मोडवर येऊन ठेपली आहे. म्हणजेच जी की उड्डाण होतील, त्याची रक्कम लागलीच चुकती करावी लागेल. जर लागलीच रक्कम अदा केली नाही तर व्हेंडर्स काम बंद करण्याची दाट शक्यता आहे.

गो फर्स्टकडे 31 मार्चपर्यंत 30 विमान होते. यातील 9 विमाने भाड्याने घेण्यात आली आहे. त्याची थकबाकी अद्याप फेडण्यात आलेली नाही. एअरलाईनच्या संकेतस्थळानुसार, गो फर्स्टच्या ताफ्यात एकूण 61 विमानं आहेत. यामधील 56 विमान A320neos आहेत आणि पाच A320ceos विमानं आहेत.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...