वेदांताशी बिनसल्यानंतर फॉक्सकॉनला मिळाला नवा पार्टनर, देशात सेमीकंडक्टर फॅक्ट्रीची उभारणी होणार
महाराष्ट्रातून वेदांता आणि फॉक्सकॉन कंपनी गुजरात जाऊन दोन्ही कंपन्यांचे बिनसले. आता तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीला नवीन पार्टनर मिळाला आहे. जर सर्वकाही सुरळीत झाले तर भारतात सेमीकडंक्टरची निर्मिती होऊ शकेल.
नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : भारतात सेमीकंडक्टर म्हणजेच चिप फॅक्टरी सुरु करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. वेदांता कंपनी तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीसोबत गुजरातमध्ये आपला प्रकल्प तयार करणार हाती. परंतू त्यांचे डील फिसकटल्याने आता फॉक्सकॉन कंपनीने देशात चिप फॅक्टरी उभारण्यासाठी नवीन पार्टनर शोधला आहे. ब्लुमबर्गच्या अहवालानूसार आता फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप भारतात सेमीकंडक्टर फॅक्टरी लावण्यासाठी STMicroelectronics NV एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स एनव्ही सोबत करार केला आहे. यासाठी आता या दोन कंपन्यांना भारत सरकारची मदत हवी आहे.
फॉक्सकॉन तैवानची मॅन्युफॅक्चरींग कंपनी आहे. तर एसटीमायक्रो फ्रान्स आणि इटालियन कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या 40 नॅनोमीटर चिप प्लांटसाठी सरकारकडून मदत मागत आहेत. या चिप कार, कॅमेरा, प्रिंटर्स आणि अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणात वापरल्या जात असतात. याआधी फॉक्सकॉन कंपनी अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या वेदांता रिसोर्सेस कंपनीशी पार्टनरशिपचा प्रयत्न केला होता. परंतू एक वर्षांतच काही कारणांनी यांची पार्टनरशिप तुटली आहे.
चिप उत्पादनाचा अनुभव
फॉक्सकॉन कंपनी एसटीमायक्रो या कंपनी सोबत करार करणार आहे. एसटीमायक्रो कंपनीला चिप निर्मितीचा अनुभव आहे. अशा प्रकारे फॉक्सकॉन कंपनी या अवघड क्षेत्रात आपले बस्तान बसवू इच्छीत आहे.
अवघड जबाबदारी
फॉक्सकॉनचे मेटल कंपनी वेदांता हिच्याबरोबरचा आधीचा करार तुटला आहे. यावरुन सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करणे किती अवघड आहे याची कल्पना येतेय यासाठी अब्जावधी डॉलरचा विशाल परिसर लागतो. आणि सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी खास तज्ज्ञांची गरज असते. फॉक्सकॉन आणि वेदांता दोघांकडेही चिप तयार करण्याचा कोणताही पूर्वानुभव नाही. परंतू एसटी मायक्रो कंपनीला चिप तयार करण्याचा अनुभव आहे.