Salary Saving : पगार पुरत नाही, मग हा प्लॅन येईल उपयोगी, महिन्याच्या शेवटी दिवस मोजावे लागणार नाही. .

Salary Saving : पगाराचे नियोजन केल्यास..खर्चाची जास्त चिंता करावी लागणार नाही..

Salary Saving : पगार पुरत नाही, मग हा प्लॅन येईल उपयोगी, महिन्याच्या शेवटी दिवस मोजावे लागणार नाही. .
बचतीतून कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 7:01 PM

नवी दिल्ली : ‘खुश है ज़माना आज पहली तारीख है’ अनेकांचा हा आनंद फार काळ काही टिकत नाही. अवघ्या आठवड्याभरानंतरच अनेकांना पुन्हा आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार खात्यात (Salary In Account) जमा होतो. पण तो टिकतो किती दिवस? खर्चाचा (Expenditure) ताळमेळ बसवता बसवता अर्धा महिना कधी निघून जातो, ते लक्षातच येत नाही. अशावेळी नियोजन केल्यास बचत(Saving) ही करता येते आणि वाढीव खर्चाही भागविता येतो.

आज खाऊन पिऊन सुखी असला तरी भविष्यातील मोठे खर्च तुमची वाट पाहत असतात. त्यामुळे भविष्यासाठी नियोजन करणे तुमच्या फायद्याचे ठरते. अनावश्यक खर्च कमी केले आणि बचतीची सवय लावली तर काही वर्षांनी मोठी रक्कम उभी राहते.

मुलांचे शिक्षण, आकस्मिक खर्च, वैद्यकीय खर्च, लग्नकार्य यासह इतर अनेक वेळा मोठ्या रक्कमेची आवश्यकता असते. तुम्ही वेळीच नियोजन केले नाही तर भविष्यातील हे मोठे खर्च तुम्ही कधीच पूर्ण करु शकणार नाहीत. त्यासाठी बचत हा चांगला पर्याय असतो.

हे सुद्धा वाचा

पगार मिळताच, सर्वात अगोदर वेतनातील काही रक्कम दुसऱ्या बँकेतील खात्यात हस्तांतरीत करा. जर दुसरे बँक खाते नसेल तर पहिल्याच आठवड्यात यातील काही ठराविक रक्कम बचत योजनांमध्ये गुंतवा.

त्यासाठी SIP चा वापर करा. नियोजीत तारखी अगोदर पूर्वनिश्चित केल्यास आपोआप त्या दिवशी रक्कम संबंधित बचत योजनेत जमा होते. त्यासाठी तुम्हाला एकदाच खटाटोप करावा लागेल. नंतर पुढील महिन्यापासून तुम्हाला आपोआप अलर्ट मिळून रक्कम परस्पर वळती होईल.

जर तुम्हाला 40,000 रुपये वेतन असेल तर त्यातील 20 टक्के रक्कम म्हणजे जवळपास 8,000 रुपये दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करा. तुम्हाला वाटेल ही मोठी रक्कम आहे. पण यातून तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम मिळणार आहे, हे लक्षात ठेवा.

तुम्ही तुमचा अनावश्यक खर्च आटोक्यात आणा. व्यसन असतील तर ते बंद करा. नसेल तर जो अनावश्यक खर्च होतो, तो कुठे होतो, हे मागील महिन्यांतील खर्चावरुन तुमच्या लक्षात येईल, हा खर्च निम्म्यावर आणा. त्याची यादी तयार करा. एकदा खर्च नियंत्रणात आला की, बचत सोपी होईल.

तुम्ही क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर तर करत नाही ना? हे तपासा, ऑनलाईन खरेदीत तुमची किती रक्कम जाते. या खरेदीची खरंच आवश्यकता होती का, हे पहा. क्रेडिट कार्डवर खर्चाची लिमिट निश्चित करा. त्याआधारे कमीत कमी खर्च करा.

दरमहा म्युच्युअल फंडात SIP द्वारे एक निश्चित रक्कम गुंतवा. तुम्ही विविध फंड्समध्ये ही रक्कम गुंतवू शकता. त्यासाठी अर्थसल्लागाराचा सल्ला घ्या. तुम्हीही थोडा अभ्यास केला तर गुंतवणूक करु शकता. साधरणतः 10 ते 20 वर्षे सलग गुंतवणूक केल्यास तुम्हाला या दीर्घ गुंतवणुकीचे चांगला परतावा मिळेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.