जगातील चौथी मोठी बॅंक भारतात, जर्मनीच्या लोकसंख्यापेक्षा अधिक ग्राहकसंख्या, कोणती बॅंक पाहा

जगातील ताकदवान बॅंकात आता भारतीय बॅंकेचे नाव घेतले जाणार आहे. एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बॅंकेच्या विलीनीकरणातून तयार झालेली एचडीएफसी बॅंक ही देशातील सर्वात जास्त बाजारमू्ल्य असलेली रिलायन्स नंतरची सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे.

जगातील चौथी मोठी बॅंक भारतात, जर्मनीच्या लोकसंख्यापेक्षा अधिक ग्राहकसंख्या, कोणती बॅंक पाहा
HDFC Merger
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 3:32 PM

नवी दिल्ली : हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंक ( HDFC BANK ) यांच्या विलीनीकरणानंतर ही बॅंक जगातील चौथी सगळ्यात मोठी बॅंक ठरली आहे. या बॅंकेची टक्कर आता अमेरिका, चीन आणि जपानच्या बॅंकांना मिळणार आहे. त्यामुळे भारताचा दबदबा जागतिक बाजारपेठेत वाढणार आहे. एचडीएफसी ट्वीन्सच्या विलीनीकरणाच्या चर्चेने शेअरबाजारात उसळी आली. एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बॅंक यांच्या एकत्र ( HDFC-HDFC Bank Merger ) येण्यामुळे एकत्रित बाजारमूल्य पाहता या बॅंकेने टाटा समुहाच्या ( TATA TCS ) टीसीएसला मागे टाकले असून रिलायन्स इंडस्ट्रीनंतर ( Reliance Industries ) ती देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

जगात जेव्हा सर्वात मोठ्या बॅंकेची चर्चा होते तेव्हा अमेरिका, चीन आणि युरोपीय बॅंकांकडे पाहीले जात होते. परंतू आता भारताची बॅंक या स्पर्धेत उतरली आहे. जगातील ताकदवान बॅंकात आता भारतीय बॅंकेचे नाव घेतले जाणार आहे. एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बॅंकेच्या विलीनीकरणातून तयार झालेली एचडीएफसी बॅंक ही जगातील सर्वात जास्त बाजारमू्ल्य असलेल्या बॅंकेत तिचे नाव सामील झाले आहे. त्यामुळे चीन अमेरिकेच्या टॉप बॅंकांना आव्हान मिळणार आहे.

जगातील चौथी मोठी बॅंक

जगात सगळ्यात मोठ्या बॅंकात जेपी मॉर्गन चेस एण्ड कंपनी, इंडस्ट्रीयल एण्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना लिमिटेड आणि बॅंक ऑफ अमेरिका कॉर्प या बॅंकांचा दबदबा आहे. ब्लूमबर्गच्या आकड्यानूसार एचडीएफसी बॅंक व्हॅल्यूएशन 172 अब्ज डॉलर असावे, जगातीस सर्वात मोठी बॅंक जेपी मॉर्गन चेस एण्ड कंपनीची व्हॅल्यूएशन 416.5 अब्ज डॉलर आहे. त्यानंतर आयसीबीसीचे 228.3 अब्ज डॉलर आहे. तर बॅंक ऑफ अमेरिकाचे 227.7 अब्ज डॉलर इतके आहे. म्हणजे एचडीएफसी जगातील चौथी मोठी बॅंक ठरणार आहे.

टाटांच्या टीसीएसला मागे टाकले

एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बॅंकेच्या एकत्रीकरणातून जी बॅंक तयार झाली आहे. तिचे एकत्रित बाजारमू्ल्य 14,22,652.57 कोटी इतके झाले आहे. टीसीएसचे बाजारमू्ल्य 13,73,882.31 कोटीच्या पुढे आहे, म्हणजे टाटांच्या टीसीएसला एचडीएफसीने मागे टाकले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजारमूल्य सध्या 17,95,506.15 कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर आता एचडीएफसी भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

रिलायन्सनंतर दुसरी मोठी कंपनी

मर्जरनंतर एचडीएफसीच्या शेअर डीलिस्टींग 13 जुलैपासून होणार आहे. हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर या दिवसापासून स्टॉक एक्सचेंजमधून हटणार आहेत. संयुक्त कंपनीचे शेअर 17 जुलैपासून ट्रेंड होतील, मर्जरमुळे एचडीएफसीला एचडीएफसी बॅंकेत 41 टक्के भागीदारी मिळेल. एचडीएफसी बॅंक आणि एचडीएफसीच्या मर्जरनंतर कंपनी मार्केट कॅपमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही बॅंक देशातील दुसरी मोठी कंपनी बनणार आहे.

जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त ग्राहक

एचडीएफसी बॅंकेच्या मर्जर नंतर तिच्या ग्राहकांची संख्या 12 कोटी इतकी होणार आहे. जर्मनीच्या लोकसंख्याहून अधिक ही संख्या आहे. मर्जरमुळे बॅंकेचे ब्रांच नेटवर्क 8,300 हून अधिक होणार आहे. तर एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1,77,000 हून अधिक होणार आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.