ट्विटर आणि मेटानंतर, ॲमेझॉनमध्ये टाळेबंदी सुरू, 10,000 कर्मचाऱ्यांना बसू शकतो फटका!
ॲमेझॉनच्या 10,000 कर्मचाऱ्यांना कंपनीने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका अनेक भारतीयांना देखील पडणार आहे.
मुंबई, Amazon ने या आठवड्यात कंपनीतील नोकऱ्या कमी (Lay off) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हार्डवेअर प्रमुख डेव्ह लिंप यांनी बुधवारी कर्मचार्यांना दिलेल्या मेमोमध्ये लिहिले, “सखोल पुनरावलोकनांनंतर, आम्ही अलीकडेच काही संघ आणि कार्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयांचा एक परिणाम असा आहे की आता काही पदांची आवश्यकता नाही.” काही दिवसांआधीच मेटा आणि ट्विटर या दोनीही मोठ्या कंपन्यांना हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला होता. आता Amazon सारख्या मोठ्या कंपनीने हा निर्णय घेतल्याने यामागे जागतिक मंदीची भीती तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे.
कंपनीने कर्मचाऱ्यांना माहिती दिली
“मला ही बातमी कळवताना खूप दु:ख होत आहे कारण आम्हाला माहित आहे की, आम्ही डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस ऑर्ग मधील एक प्रतिभावान Amazonian गमावणार आहोत…” लिंप म्हणाले की कंपनीने प्रभावित कर्मचार्यांना सूचित केले आहे आणि नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचा विचार करत आहे. काम करणे सुरू ठेवू. असे ते म्हणाले.
10 हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी
न्यू यॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार Amazon कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानातील सुमारे 10,000 कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. ही कपात कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात असेल, असे अहवालात म्हटले आहे. हा आकडा त्याच्या कॉर्पोरेट कर्मचार्यांच्या सुमारे 3 टक्के आहे आणि एकूण टाळेबंदीची संख्या बदलू शकते.
Amazon चे प्रवक्ते काय म्हणाले?
ॲमेझॉनच्या प्रवक्त्या केली नॅनटेल यांनी सांगितले की, वार्षिक ऑपरेटिंग प्लॅन पुनरावलोकन प्रक्रियेचा भाग म्हणून काही भूमिकांची यापुढे आवश्यकता नाही. TechCrunch ने अहवाल दिल्याप्रमाणे, Nantel म्हणाले, “आमच्या वार्षिक ऑपरेटिंग प्लॅन पुनरावलोकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून, आम्ही नेहमी आमच्या प्रत्येक व्यवसायाकडे पाहतो आणि आम्हाला काय बदलण्याची गरज आहे याचा विचार करतो. आम्ही हे निर्णय हलकेपणाने घेत नाही, मात्र या निर्णयाचा कोणावरही परिणाम होऊ शकतो.”
कर्मचारी कपात प्रामुख्याने त्याच्या उपकरण संस्था, किरकोळ विभाग आणि मानवी संसाधनांवर परिणाम करेल. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा नोटीस पिरेड दिल्याची माहिती आहे. Amazon व्यतिरिक्त, US Tech Giant Meta आणि Twitter ने देखील मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची घोषणा केली आहे.