6 महिन्यांच्या लहानग्याची पहिली कमाई 4 कोटी; यापूर्वीच नावावर जमा आहेत 210 कोटी

Infosys चे चेअरमन Narayan Murthy यांचा 6 महिन्यांचा नातू अब्जाधीश झाला आहे. नारायण मूर्ती यांनी नातवाच्या नावे इन्फोसिसचे 15 लाख शेअर नावे केले होते. त्यांचे मूल्य 210 कोटी रुपये इतके आहे. जगातील सर्वात की वयाचा अब्जाधीश म्हणून त्यांच्या नातवाने विक्रम केला आहे.

6 महिन्यांच्या लहानग्याची पहिली कमाई 4 कोटी; यापूर्वीच नावावर जमा आहेत 210 कोटी
कमाईचे या तान्हुल्याने तोडले सर्व रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 5:14 PM

इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा 4 महिन्याचा नातू एकाग्र, याच्या नावे कंपनीचे 15 लाख शेअर केले होते. त्याचे बाजारातील मूल्य आता 210 कोटी रुपये आहे. त्यांनी एकाग्रला इन्फोसिसमधील 0.04 टक्क्यांचा वाटा दिला. आता आलेल्या अपडेटनुसार, एकाग्रची पहिली कमाई 4 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अजून भर पडली आहे.

कशी वाढली कमाई ?

नुकतीच इन्फोसिसने कंपनीचा निकाल जाहीर केला. कंपनीला मोठा फायदा झाला. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत इन्फोसिसचा नेट प्रॉफिट वर्षाआधारे जवळपास 30% वाढ झाली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 7,969 कोटी रुपयांची भर पडली. तर चौथ्या तिमाहीत गेल्या वर्षी कंपनीला नेट प्रॉफिट 6,128 कोटी रुपये झाला होता. तर या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 11,058 कोटींचा निव्वळ नफा झाला. या नफ्यामुळे कंपनीने शेअरधारकांना 28 रुपयांचा लाभांश जाहीर केला. नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र याला पण या डिव्हिडंडचा फायदा झाला. त्याची 4 कोटींची कमाई झाली.

हे सुद्धा वाचा

असे आहे गणित

सध्या इन्फोसिसच्या शेअरचे मूल्य जवळपास 1400 रुपये आहे. कंपनीने 28 रुपयांचा लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी 31 मे ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. तर लाभांशची रक्कम 1 जुलै रोजी खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. एकाग्रकडे कंपनीचे 15 लाख शेअर आहेत. त्यामुळे एकाग्रला 4.2 कोटी रुपये लाभांश रुपात मिळणार आहे. या लाभांशात 20 रुपये अंतिम लाभाश तर 8 रुपये खास लाभांश देण्यात येणार आहे.

नातावाला दिले शेअरचे गिफ्ट

इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी त्यांचा नातू एकाग्र याला 240 कोटी रुपये मूल्याचे 15 लाख शेअर भेट म्हणून दिले. एकाग्र हा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णना यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 10 नोव्हेंबर 2023 रोजी बंगळुरुत झाला होता. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी अक्षता ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सोनक यांची पत्नी आहे. अक्षता मूर्ती हिला दोन मुली आहेत. या शेअर गिफ्टमुळे नारायण मूर्ती यांची कंपनीतील हिस्सेदारी 0.40% कमी होऊन 0.36 % इतकी राहिली आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.