Air India : मेगा डीलची मोठी अपडेट! कंपनीने दिली 840 विमानांची ऑर्डर

Air India : एअर इंडियाने खासगीकरणाची वाट धरल्यानंतर मोठे बदल दिसून येत आहे. बिग डील आणि मोठी अपडेट समोर येत आहे. आता एअरबसकडे कंपनीने 840 विमानांची ऑर्डर दिल्याने, त्याची चर्चा रंगली आहे.

Air India : मेगा डीलची मोठी अपडेट! कंपनीने दिली 840 विमानांची ऑर्डर
बिग डील
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 5:42 PM

नवी दिल्ली : मंगळवारी एअर इंडियाने (Air India) एअरबस (Airbus) सोबत मेगा डीलची घोषणा केली होती. हा सौदा, व्यवहार, करार पुढे नेत कंपनीने 840 विमानांची ऑर्डर दिली आहे. Air India च्या सीटीओने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार कंपनीने 370 विमान खरेदीचा पर्याय सुरक्षीत ठेवला आहे. यापूर्वी एअर इंडियाने फ्रांसच्या Airbus सोबत मोठा करार करण्याची घोषणा केली होती. या करारातंर्गतच ही ऑर्डर देण्यात आली आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर आता मोठे बदल होतील, हे स्पष्ट झाले होते. हा अंदाज खरा ठरला आहे. महाराजाने आता कात टाकली आहे. या मेगा डीलमुळे भारतात नवीन रोजगार येतील आणि तरुणांच्या हाताला काम मिळेल, अशी आशा पल्लवीत झाल्या आहेत.

एअर इंडियाचे चीफ कमर्शियल ॲंड ट्रांसफोर्मेशन ऑफिसर निपुन अग्रवाल यांनी लिंक्डइनवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी एअरलाईने विमान खरेदीची ऑर्डर दिल्यापासून जगभरातून या निर्णयाचे स्वागत असल्याबद्दल धन्यवाद दिले. त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

दोन वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. याच प्रक्रियेचा भाग म्हणून 840 विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरनुसार आता येत्या दशकात एअरबस आणि बोइंगकडून 470 विमान खरेदी करण्यात येतील. तसेच यामध्ये 370 विमान खरेदीचा पर्याय ही समोर आहे.

हे सुद्धा वाचा

सध्याच्या काळात एखाद्या विमान कंपनीने दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय विमान सेवेसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. या डीलच्या एक दिवसापूर्वी कंपनीने सांगितले होते की, त्यांनी 470 विमानांसाठी ठेका दिला आहे. ज्यामध्ये एअरबसकडून 250 विमान आणि बोईंग कंपनीकडून 220 विमान खरेदी करण्यात येणार आहे. सीएफएम इंटरनॅशनल, रॉल्स-रॉयस आणि जीई एअरोस्पेस सोबत इंजिनाच्या देखभालीसाठी डील केल्याची पुस्तीही जोडण्यात आली.

अग्रवाल यांनी सांगतिले की, हा करार एअर इंडियाला जगातील सर्वोत्तम विमान सेवा देणाऱ्या कंपनीत बदलण्यासाठी करण्यात आला आहे. भारताला जगातील सर्वात मोठ्या शहरांशी थेट जोडण्याचे टाटा समूहाचे लक्ष्य आहे. टाटा समूहाची एअर इंडिया एअरबसकडून 40 मोठ्या आकाराची ए350 तर 210 छोटी विमान खरेदी करणार आहे.

एका ऑनलाईन बैठकीत चंद्रशेखरन यांनी सांगितले की, कंपनीने विमानांच्या खरेदीसाठी एअरबससोबत करार केला आहे. या बैठकीत इतर लोकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ हे पण उपस्थित होते. टाटा समूहाने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात एअर इंडियाचे अधिग्रहण केले होते. या अधिग्रहणानंतर टाटा समूहाने अनेक बदल केले आहेत. तर काही मोठे बदल प्रस्तावित आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.