खुशखबर ! रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने केली ‘ही’ मोठी घोषणा, ग्राहकांना होणार मोठा फायदा
नव्या घोषणेनुसार एअरटेलने अमर्यादित मोफत व्हाईस कॉलची सुविधा सुरुच राहणार असल्याचं म्हटलंय. (airtel unlimited voice calling)
मुंबई : टेलिकम्यूनिकेशनच्या क्षेत्रात नावाजलेल्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) लोकल कॉल्स फ्री केल्यानंतर आता एअरटेलनेही (Bharti Airtel) आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. नव्या घोषणेनुसार एअरटेलने अमर्यादित मोफत व्हाईस कॉलची सुविधा सुरुच राहणार असल्याचं म्हटलंय. तसेच, ग्राहकांकडून कोणतेही आययूसी चार्जेस घेतले जाणार नसल्याचंही भारती एअरटेलने सांगितलं आहे. (airtel announcees that unlimited voice calling feature will be continue )
अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सुरुच राहणार
याविषयी बोलताना भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पुरी यांनी सांगितलं की, “आम्ही ग्रहकांना प्रिपेड तसेच पोस्टपेड प्लॅनवर सर्व नेटवर्कसाठी आधीपासूनच मोफत सुविधा देत आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांना उत्तमातील उत्तम सेवा देण्यास बांधिल आहोत. त्यामुळे मोफत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ग्राहकांसाठी चालूच राहील.
रिलायन्स जिओची मोफत कॉलिंगची सुविधा
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मोफत कॉलींगची सुविधा पुन्हा एकदा सुरु केली आहे. रिलायन्स जिओने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आदेशानुसार 1 जानेवारीपासून इंटरकनेक्ट वापर शुल्क (IUC) घरगुती व्हॉईस कॉलसाठी बंद केले जाणार आहेत. म्हणजेच, आता इतर नेटवर्कवर रिलायन्स जिओकडून कॉल करण्यासाठी स्वतंत्र पैसे घेतले जाणार नाहीत.
इतर नेटवर्कमधून ग्राहकांना कॉल करण्यासाठी पैसे आकारले जातील असा निर्णय सप्टेंबर 2019 मध्ये रिलायन्स जिओने घेतला होता. यासाठी ट्राय कंपनीच्या आययूसी शुल्काचा हवाला देण्यात आला होता. पण आता ट्रायनेच आययूसी रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे रिलायन्स जिओने लोकल ऑफलाइन कॉलही मोफत करण्याचं जाहीर केलं आहे.
लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर प्रभावी? आयुष मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत#RedAntChutney | #CoronaVaccine | #RedAnt | #ayush https://t.co/epH22niEAd
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021
संबंधित बातम्या :
Airtel ची Jio ला टक्कर, 499 रुपयांमध्ये Xstream प्लॅन लॉन्च
व्हॉट्सअॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया
फेसबुकवर तुम्ही हमकास करता ‘या’ चुका, सहज मिळते हॅकर्सला माहिती
(airtel announcees that unlimited voice calling feature will be continue )