अलर्ट! सुकन्या समृध्दी खातेदारांनी 10 दिवसात पूर्ण करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दंड
नवी दिल्ली : जर आपण आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धि खाते देखील उघडले असेल तर खात्यात पैसे जमा करण्यासाठी शेवटचे 10 दिवस राहिलेत. म्हणजेच 31 मार्चपर्यंत पैसे जमा करायचे आहेत. यानंतर आपल्याला त्यावर दंड भरावा लागेल. एका वर्षात सुकन्या खात्यात किमान 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे […]
नवी दिल्ली : जर आपण आपल्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धि खाते देखील उघडले असेल तर खात्यात पैसे जमा करण्यासाठी शेवटचे 10 दिवस राहिलेत. म्हणजेच 31 मार्चपर्यंत पैसे जमा करायचे आहेत. यानंतर आपल्याला त्यावर दंड भरावा लागेल. एका वर्षात सुकन्या खात्यात किमान 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Alert! Sukanya Samrudhi account holders should complete this work in 10 days, otherwise they will have to pay penalty)
10 दिवसांत पैसे जमा करणे का महत्वाचे
सुकन्या समृद्धि योजना ही सरकारची एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. त्याचे खाते केवळ 250 रुपयांमध्ये उघडता येते. परंतु खाते चालू ठेवण्यासाठी दर वर्षी किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. जर ही रक्कम जमा केली नाही तर आपले खाते डीफॉल्ट मानले जाईल. या प्रकरणात, हे खाते निष्क्रिय होते. ते पुन्हा सक्रिय करणे सोपे आहे. त्यासाठी पुन्हा तुम्हाला तुमची बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
कसे अॅक्टिव्ह कराल सुकन्या समृद्धी खाते?
पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्याचे खाते निष्क्रिय झाले तर ग्राहकास त्याच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत जावे लागेल. यानंतर आपल्याला पुन्हा खाते सुरू करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. तसेच जेवढी वर्षे किमान पेमेंट थकले असेल ते भरावे लागेल. समजा तुमचे खाते दोन वर्षांपासून चालू नसेल तर तुम्हाला दोन वर्षाचे मिनिमम पेमेंट 500 रुपये आणि 100 रुपये दंड भरावे लागेल. एकूण 600 रुपये द्यावे लागतील. असे केल्यावर आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल.
सहज मिळतील 15 लाख रुपये
या आर्थिक वर्षाची चालू तिमाही 31 मार्च रोजी संपत आहे. यानंतर 1 एप्रिलपासून पुन्हा नवीन व्याजदर लागू होतील. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील तिमाहीत हे व्याजदर कायम राहू शकते. एखादा व्यक्तीने 14 वर्षांसाठी दर महिन्याला 3000 रुपये किंवा वर्षाला 36 हजार रुपये गुंतवले, तर 14 वर्षात वार्षिक 7.6 टक्के कंपाऊंडिंगनुसार ही रक्कम 9,11,574 रुपये होईल. यानंतर सात वर्षे या रकमेवर वार्षिक 7.6 टक्के व्याजदराने रिटर्न मिळेल. शेवटी 21 व्या वर्षी मॅच्युरिटीला ही रक्कम 15,22,221 रुपये मिळेल.
मासिक 12500 रुपये किंवा वार्षिक 1.50 लाख रुपये 14 वर्षे गुंतवणूक केले, तर 14 वर्षात वार्षिक 7.6 टक्के कंपाउंडिंगच्या हिशोबाने ही रकम 37,98,225 रुपये होईल. यानंतर सात वर्षे या रकमेवर वार्षिक 7.6 टक्के व्याजदराने रिटर्न मिळेल. मॅच्युरिटी वेळी म्हणजेच 21 व्या वर्षी ही रक्कम 63,42,589 रुपये होईल. (Alert! Sukanya Samrudhi account holders should complete this work in 10 days, otherwise they will have to pay penalty)
लहान मुलांना ‘हे’ पदार्थ खाण्यासाठी देत आहात, थांबा अगोदर हे वाचा…https://t.co/0XHV9ZppIf #children | #food | #Health | #lifestyle
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2021
इतर बातम्या
‘कारभारी दमानं… होऊ द्या दमानं’चा कारभारी कोण माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा