Mukesh Ambani : आलिया भट्ट हिची ही कंपनी रिलायन्स समूहात, मुकेश अंबानी करणार खरेदी

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या विस्ताराचे सत्र सुरुच आहे. या वर्षात अनेक ब्रँड्स दाखल झाले आहेत. आता त्यात अभिनेत्री आलिया भट्टचा लहान मुलांसाठीचा हा ब्रँड पण अंबानी यांच्या ताब्यात येणार आहे.

Mukesh Ambani : आलिया भट्ट हिची ही कंपनी रिलायन्स समूहात, मुकेश अंबानी करणार खरेदी
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 3:32 PM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स समूहाचा विस्तार सुरुच आहे. यंदा अनेक नावाजलेले देशी ब्रँड्स आणि परदेशातील काही ब्रँड्स या समूहात दाखल झाले. त्यात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या या ब्रँड्स पण सहभाग असेल. आलिया भट्टने एड-ए-मम्मा (Ed-a-Mamma) या नावाने लहान मुलांसाठी खास ब्रँड बाजारात उतरवला होता. हा ब्रँड झटपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. आता हा ब्रँड रिलायन्स समूहाची ओळख असेल. याविषयीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. या महिन्यातच ही डील होण्याची शक्यता आहे. या डीलमधून आलिया भट्ट हिला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. रिलायन्स रिटेलच्या चाईल्ड वेअर्स पोर्टफोलिओचा ग्राफ यामुळे वधारेल.

कॅम्पा रिलायन्समध्ये

काही दिवसांपूर्वी रिलायन्स समूहाने कॅम्पा कोला (Campa Cola) ब्रँड खरेदी करुन तो बाजारात उतरवला. या ब्रँडने बाजारात धुमाकूळ घातला. आईसक्रीम सेक्टरमध्ये पण रिलायन्सने नवीन ब्रँड उतरवला आहे. सध्या नावाजलेले ब्रँड आहेत. त्यांना रिलायन्सच्या इंडिपेंडेंस ब्रँडचे मोठे आव्हान असेल.

हे सुद्धा वाचा

रिलायन्स खरेदी करणार कंपनी

रिलायन्स अभिनेत्री आलिया भट्ट हिची एड-ए-मम्मा हा ब्रँड खरेदी करणार आहे. ही डील 300-350 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. याविषयीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. रिलायन्स ब्रँड, रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची सहायक कंपनी आहे. रिटेल बिझनेसमध्ये ही कंपनी जोरात आहे.

इतक्या कोटींचे मूल्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट हिच्या कंपनीचे मूल्य 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. हा ब्रँड ऑनलाईन सेल करतो. यामुळे रिलायन्सच्या किड्सवेअर पोर्टफोलिओ अधिक मजबूत होईल. मदर केअर आणि बेबी केअर या सेक्टरमध्ये दबदबा तयार करण्यासाठी रिलायन्स काम करत आहे.

10 दिवसांत होईल सौदा

एड-ए-मम्मा, रिलायन्स यांच्याकडून या डीलविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट ही इटरनलियामध्ये संचालक आहे. याविषयीच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या एका अधिकाऱ्याने या डीलविषयी माहिती दिली. त्यानुसार, रिलयान्स आणि एड-ए-मम्मा यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पुढील दहा दिवसांत सौदा होण्याची शक्यता आहे. या व्यवहाराने रिलायन्सची किड्सवेअरमध्ये मजबूत पकड येईल.

येथे होत आहे विक्री

एड-ए-मम्मा ची सुरुवात 2020 मध्ये झाली होती. सध्या किड्सवेअर सोबतच हा ब्रँड टीनेज आणि मॅटरनिटी सेगमेंटपर्यंत विस्तारला. मिंत्रा, अजियो, फर्स्टक्राई, एमेझॉन, टाटा क्लिक अशा अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा ब्रँड आहे. वेबस्टोर, लाईफस्टाईल आणि शॉपर्स स्टॉपसारख्या रिटेल चेन्सच्या माध्यमातून कपड्यांची विक्री करण्यात येते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.