मुंबई: कारप्रेमींच्या पसंतीस उतरलेल्या Ertiga चं नवं मॉडेलही कारप्रेमींना आवडेल असा विश्वास मारुती सुझुकीला आहे. कंपनी आपल्या 2200 डीलर्सच्या माध्यमातून ही भारदस्त एमपीव्ही कार बाजारात आणत आहे. नव्या अर्टिगामध्ये ग्राहकांना आवडतील असे अनेक फीजर्स अक्सेसरीज असतील, असं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीचं हे ब्रोशर लीक झालं आहे.
4 व्हेरिएंटमध्ये नवी अर्टिगा
न्यू मारुती अर्टिगा MPV एल, व्ही, झेड आणि झेड प्लस अशा चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. यांच्या किमती 7.44 लाखांपासून ते 11 लाख रुपयांपर्यंत असतील. या कारच्या आतील आणि बाहेरील लूकमध्ये बदल करण्यात आले आहेत. याशिवाय न्यू अर्टिगामध्ये 50 अॅक्सेसरीज देण्यात आल्या आहेत. विविध स्टायलिश किटसह फ्रंट, रियर आणि साईड अंडरबॉडी स्पॉयलरचा समावेश आहे.
काय खास?
व्हील कव्हर, रियर अपर स्पॉयलर, ब्लॅक अलॉय, साईड बॉडी मोल्डिंग, डोर वायजर, डिजाइन्ड मॅट, बूट मॅट, कार्पेट मॅट, इंटिरियर स्टाइलिंग कीट यासह असंख्य नव्या बाबी या कारमध्ये देण्यात आल्या आहेत.
नव्या अर्टिगाचं बुकिंग कसं करायचं?
जुन्या अर्टिगापेक्षा नव्या अर्टिगाचा लूक दमदार आहे. हा लूक टोयोटाच्या नव्या इनोव्हा क्रिस्टाशी मिळता जुळता आहे. या गाडीची Honda BR-V आणि महिंद्रा Marazzo शी स्पर्धा असेल. ही कार आता कंपनीची अधिकृत वेबसाईट किंवा डीलरमार्फत बूक करु शकता.
जुन्या अर्टिगापेक्षा साईज मोठी
नव्या अर्टिगा 2018 ची साईज जुन्या अर्टिगाच्या तुलनेत थोडी मोठी आहे. या कारचं इंजिनही दमदार आहे. इनोव्हा नजरेसमोर ठेवूनच या गाडीची निर्मिती केल्याचं जाणकार सांगतात.
फीचर्स
नवी अर्टिगा 2018 मध्ये 1.5 लीटर K15B, DOHC, VVT पेट्रोल इंजन आहे. जुन्या गाडीत ते 1.4 लीटर होतं. नव्या कारचं इंजिन 104 HP चे आहे, जे 138 न्यूटन मीटर टार्क निर्मित करु शकतं. ही कार 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन आहे. शिवाय कारच्या इंटिरियरमध्ये डॅशबोर्ड देण्यात आला आहे. तसंच 6.8 इंज टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. शिवाय की-लेस स्टार्ट-स्टॉप बटण आहे. नवी अर्टिगा MPV ही HEARTECT च्या धरतीवर बनवली आहे. यावर कंपनीने स्विफ्ट, स्विफ्ट डिझायर, बलेनो आणि इग्निस बनवली होती.