कॉलेज बंक केले होते, नोकरी करताना 21 वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, लार्सन अँड टुब्रोचे ए.एम.नाईक यांचा अनोखा वस्तूपाठ

एल अँड टी कार्यालयात काम करताना पत्नी घरी एकटी असायची अनेकवेळा रात्री 12 वाजता माझी शेवटची बस चुकायची.  मग मी कार्यालयात येऊन झोपायचो

कॉलेज बंक केले होते, नोकरी करताना 21 वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, लार्सन अँड टुब्रोचे ए.एम.नाईक यांचा अनोखा वस्तूपाठ
LT’s_Chairman_AM_Naik_Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 10:35 PM

नवी दिल्ली : लार्सन अँड टुब्रोचे ( L&T ) ए.एम.नाईक यांनी कंपनीला साठ वर्षे सेवा दिली. आपल्या सक्सेस फुल करीयरचे रहस्य हे आहे की दर तीन वर्षांनी आपण परिस्थितीनुरुप स्वस्तामध्ये बदल करायचो. त्यामुळे आपण या क्षेत्रात टीकू शकलो असे नाईक म्हणतात. त्यांनी कॉलेजमध्ये अनेक वेळा दांड्या मारल्या परंतू 21 वर्षे सुटी न घेता पंधरा तास काम केल्याचे त्यांनी इंग्रजी वेबसाईटला मुलाखत देताना सांगितले. ज्युनिअर इंजिनिअर ते कंपनीचे चेअरमन पदापर्यंत झेप घेणारे नाईक सप्टेंबरमध्ये निवृत्त होत आहेत.

कॉलेजला मला आमचे प्रोफेसर नेहमी गैरहजेरीवरुन टोमणे मारायचे. मी विद्यार्थी असताना इतर कामातच व्यस्त असायचो तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अभावाने लेक्टरला बसायचो. शिक्षक म्हणायचे एकाला दहावीत चांगले मार्क आहेत पण तो कॉलेजमध्ये काही चांगले गुण आणेल असे वाटत नाही असे आपल्याकडे पाहून शिक्षक बोलायचे असे नाईक सांगतात.

परंतू परिस्थिती बदलली आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्यात संपूर्ण बदल झाला. कॉलेज संपल्यावर स्टुडन्ट लाईफ संपले आणि कॉपोर्रेट लाईफ सुरु होत आहे. आणि कॉलेज बंक करणाऱ्याने 21 वर्षे सुटी न घेता काम केल्याचे नाईक म्हणाले. एल अँड टी कार्यालयात काम करताना पत्नी घरी एकटी असायची अनेकवेळा रात्री 12 वाजता माझी शेवटची बस चुकायची.  मग मी कार्यालयात येऊन झोपायचो असे नाईक यांनी मनी कंट्रोलशी बोलताना सांगितले.

त्यानंतर मि. बेकर ज्यांनी मला नोकरीवर ठेवले होते त्यांनी मला दोन वर्षांनंतर स्कूटर दिली. मला कार लवकर मिळावी यासाठी त्यांना पुढाकार घेतला. अर्थात हे सर्व मी कंपनीसाठी जीव ओतून काम केल्याने शक्य झाले. मी जे केले त्याचा अभिमान आहे. मला असा प्लॅटफॉर्म तयार करायचा होता ज्या देशाला फायदा होईल असे नाईक यांनी स्पष्ट केले.

30 सप्टेंबर रोजी निवृत्त 

L&T च्या अनेक प्रगती आणि बदलांमागची प्रेरणादायीशक्ती असलेले नाईक 30 सप्टेंबर रोजी आपल्या पदावरून पायउतार होत आहेत, परंतु L&T च्या कामगारांच्या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत राहतील. एक ज्युनिअर इंजिनियर ते कंपनीचे चेअरमन असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.