दर तासाला ६७ कोटींची कमाई, अंबानींपेक्षा दुप्पट आणि अदानींहून तिप्पट संपत्ती, कोण आहे हा असामी ?
जगातील एका असामीला दर तासाला ६७ कोटीची कमाई होत आहे. त्यांचा वार्षिक वेतनापेक्षाही ही कमाई शंभर पट अधिक आहे. मुकेश अंबानी पेक्षा तर दुप्पट तर गौतम अदानी यांच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत आहेत.
आपण अनेकदा एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला ५० लाखांचे पॅकेज आहे. म्हणजे त्याला महिन्याला लाखो रुपयांचा पगार असणार असे ऐकून आपण आश्चर्यचकीत होत असतो. परंतू एखाद्याला दर तासाला ६७ कोटींची कमाई होत असेल तर याला काय म्हणाल ? यावर तुमचा विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या आणि अॅमॅझॉन ( Amazon ) या कंपनीचे मालक जेफ बेजॉस यांच्या बद्दल बोलत आहोत.त्यांची तासांची कमाई काही लोकांची आयुष्यभराच्या कमाईपेक्षा कितीतरी अधिक पट जास्त आहे.
दर तासाला आठ अब्ज डॉलरची कमाई
Inc.com च्या बातमीनुसार साल २०२४ मध्ये अब्जाधीश जेफ बेजोस यांनी दर तासाला सुमारे ८ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ६७.२० कोटी रुपये कमावले आहेत. जेफ बेजॉस यांच्या मते अॅमॅझॉन ( Amazon ) कंपनीचे सीईओ असताना आणि या पदावरुन दूर झाल्यानंतर त्यांनी त्यांचे वेतन वाढवलेले नाही. या मागे सर्वात मोठे कारण हे आहे की त्यांच्या अॅमॅझॉनमधील हिश्शाची कमाई इतकी होते की त्यांना त्यांचे वेतन वाढविण्याची काही आवश्यकता पडत नाही.
वार्षिक वेतनाच्या शंभर पट दर तासांती कमाई
जेफ बेजोस यांचे वार्षिक वेतन ८० हजार डॉलर म्हणज ६७ लाख आहे. तर त्यांचे दर तासांचे उत्पन्न ६७ कोटी रुपये आहे. त्यामुळे त्यांच्या वर्षभराच्या वेतन एका तासांत कमावलेल्या पैशांपेक्षा १०० पट कमी आहे.
अंबानी यांच्या दुप्पट तर अदानी यांच्या तिप्पट श्रीमंत
Amazon चे प्रमुख असलेले जेफ बजोस हे टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक इलॉन मस्क यांच्यानंतरचे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पेक्षा दुप्पट श्रीमंत आहेत. ब्लूमबर्ग बिल्येनिअर इंडेक्सच्या मते जेफ बेजोस यांची संपत्ती २४६ अब्ज डॉलर आहे. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९६.७ अब्ज डॉलर आहे. एवढेच नाही तर भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमत गौतम अदानी यांच्या पेक्षा बेजोस तिप्पट श्रीमंत आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती ८२.१ अब्ज डॉलर आहे.
जगातील सर्वात श्रीमंत ज्यू जेफ बेजोस
१२ जानेवारी १९६४ रोजी Amazon चे प्रमुख जेफ बेजोस यांच्याजवळ कंपनीतील आतापर्यंत १० टक्के हिस्सेदारी आहे. बेजोस यांना लहानपणा पासून प्रत्येक गोष्ट कशी काम करते हे जाणण्याची जिज्ञासा होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पालकांच्या गॅरेजला लॅबोरेटरीत बदलले. त्यानंतर ५ जुलै १९९४ रोजी त्यांनी सिएटल येथील आपल्या या गॅरेजमध्ये Amazon कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. ५ जुलै २०२१ रोजी त्यांना कंपनीचे सीईओ पद सोडावे लागले. आणि कंपनीत तर कार्यकारी अध्यक्ष बनले. त्यांना जगातील सर्वात श्रीमंत ज्यू देखील म्हटले जाते.