गणेशोत्सव, दिवाळी, होळी.. असे मोठमोठे सण-उत्सव म्हटलं की पूर्वी आई-बाबांसोबत बाजारात जाऊन सणासुणीच्या सामानाची खरेदी केली जायची. आता मोबाइल आणि डिजिटलच्या जमान्यात एका क्लिकवर तुम्ही घरातील छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी वस्तू ऑर्डर करू शकतो. ती वस्तू तुम्ही निवडलेल्या तारखेनुसार घराच्या दारापर्यंत पोहोचवली जाते. एखादी वस्तू खरेदी करणं हल्ली इतकं सोपं झालंय. मात्र ॲपमध्ये एखादी वस्तू ऑर्डर करण्यापासून ते घरापर्यंत ती डिलिव्हर होण्यापर्यंत एक मोठं ई-कॉमर्स काम करतंय. यामागे किती लोक कसे काम करतायत, किती पैशांची उलाढाल होतेय, छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची यात काय भूमिका आहे, ते आपण या लेखात समजून घेऊयात. ‘ॲमेझॉन डॉट इन’ हा सध्या देशातील सर्वांत मोठा ई-कॉमर्स व्यवसाय आहे. देशभरातील लाखो ग्राहक ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची आतुरतेने वाट पाहत असतात. या ॲमेझॉनची प्रत्यक्षात सुरुवात 5 जून 2013 रोजी झाली. देशात सर्वाधिक प्रॉडक्ट सर्च हे ॲमेझॉनवरच होतं. बेंगळुरूमध्ये ॲमेझॉनचा मोठा FC सेंटर (फुलफिलमेंट सेंटर) आहे. लाखो चौरस फुटांमध्ये हा एफसी सेंटर पसरलेला आहे. यासारखेच...