Dosa King : केवळ 18 रुपयांच्या पगारावर हॉटेलमध्ये घासली भांडी,  आज कोट्यवधींचे मालक, डोसा किंगची प्रेरणादायी कहाणी

Dosa King : 'वाळूचे कण रगडता तेलही गळे!' ही म्हण आपण रोज वापरतो. पण खरंच प्रयत्न केले तर तुमचेही आयुष्य बदलू शकते. कधीकाळी केवळ 18 रुपये पगारावर भांडी घासणाऱ्या माणसाने आज स्वतःचे साम्राज्य उभारल्याचे वाचून तुम्हालाही प्रेरणा मिळले.

Dosa King : केवळ 18 रुपयांच्या पगारावर हॉटेलमध्ये घासली भांडी,  आज कोट्यवधींचे मालक, डोसा किंगची प्रेरणादायी कहाणी
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 9:01 PM

नवी दिल्ली : प्रयत्नांती परमेश्वर! प्रयत्न करणाऱ्यांची आणि परिस्थितीशी दोन हात करणाऱ्यांना यश मिळतेच. पण त्यासाठी मेहनत आणि सहनशीलता आवश्यक आहे. ‘वाळूचे कण रगडता तेलही गळे!’ ही म्हण आपण रोज वापरतो. पण खरंच प्रयत्न केले तर तुमचेही आयुष्य बदलू शकते. कधीकाळी केवळ 18 रुपये पगारावर भांडी घासणाऱ्या माणसाने आज स्वतःचे साम्राज्य उभारल्याचे वाचून तुम्हालाही प्रेरणा मिळले. जयराम बानन (Jayaram Banan) यांचा गरिबीतून श्रीमंतीकडचा हा प्रवास खडतर असला तरी प्रेरणादायी आहे. ते सागर रत्ना (Sagar Ratna) रेस्टॉरंटचे मालक आहे. आज भारतात त्यांचे 50 हून अधिक हॉटेल्स आहेत. अनेक उद्योजकांच्या अशाच प्रेरणादायी कथा आहेत.

साऊथ इंडियन फूडसाठी त्यांचे हॉटेल नावाजलेले आहे. जयराम बानन यांनी कधीकाळी हॉटेलमध्ये पडेल ते काम केले आहे. त्यांनी भांडीपण घासली आहेत. त्यात त्यांना कसलाच कमीपणा वाटला नाही. हे काम करत असतानाच त्यांनी स्वतःचे हॉटेल सुरु करण्याचा मनाशी करार केला आणि त्यासाठी आवश्यक ती मेहनत आणि सहनशीलता अंगी बानली. आज त्यांना नॉर्थचा डोसा किंग असे म्हणतात.

कर्नाटक राज्यातील मंगळुर जवळील उड्डपीमध्ये बानन यांचा जन्म झाला. मीडिया रिपोर्टसनुसार, त्यांचे वडील ड्रायव्हर होते. रागीट असल्याने जयराम यांना वडिलांची भीती वाटत होती. परीक्षा नापास झाल्यावर वडील त्यांना फटकारत. या भीतीमुळे त्यांनी 13 व्या वर्षी घर सोडले. त्यापूर्वी वडिलांच्या खिशातून काही पैसे घेतले. मंगळुरातून त्यांनी थेट मुंबई गाठली. ही गोष्ट 1967 सालामधली होती.

हे सुद्धा वाचा

मुंबईत त्यांच्या अडचणी उलट वाढल्या. वय एकतर लहान, त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते. राहण्यासाठी जागा नव्हती. पण त्यांना एका हॉटेलमध्ये वेटरचे काम मिळाले. टेबल साफ करणे, स्वच्छता ठेवणे, भांडी घासणे, असे कामे त्यांनी केली. या हॉटेलमध्ये त्यांनी जवळपास 6 वर्षे काम केले. वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत पोहचले. परंतु, त्यांच्या डोक्यात स्वतःचे हॉटेल असावे, असे स्वप्न होते. हे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

त्याचवेळी मुंबईत साऊथ इंडियन हॉटेल्स सुरु होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर ते दिल्लीला गेले. तिथे त्यांचा एक भाऊ उड्डपी हॉटेलमध्ये होता. काही दिवस शाकाहारी हॉटेलमध्ये काम केल्यानंतर 1974 मध्ये त्यांनी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्‍सची कॅन्टीन चालवली. त्यानंतर 1986 साली त्यांचे स्वतःचे सागर हॉटेल सुरु केले. या हॉटेलच्या जागेचे आठवड्याचे भाडे 3,250 रुपये होते. पहिल्याच दिवशी त्यांना 408 रुपयांची कमाई झाली.

काही दिवसातच त्यांनी या व्यवसायात जम बसवला. त्यांच्या हॉटेलची लोकप्रियता वाढली. दिल्लीत दक्षिण खाद्यपदार्थांच्या या हॉटेलने लवकरच नाव काढले. त्यानंतर बानन यांनी मागे वळून पाहिले नाही. आज सागर या रेस्टॉरंटच्या शाखा भारतातच नाही तर कॅनाडा, सिंगापूर, बँकॉक आणि इतर ठिकाणी आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.