Digital Rupee : आनंद महिंद्रा यांनी खरेदी केले डाळिंब, डिजिटल रुपयात केले पेमेंट, फळ विक्रेत्याकडे डिजिटल रुपयाचा श्रीगणेशा!

Digital Rupee : लवकरच ई-रुपयाच्या माध्यमातून तुम्हाला ही व्यवहार पूर्ण करता येणार आहे.

Digital Rupee : आनंद महिंद्रा यांनी खरेदी केले डाळिंब, डिजिटल रुपयात केले पेमेंट, फळ विक्रेत्याकडे डिजिटल रुपयाचा श्रीगणेशा!
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 8:50 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनेही (RBI) डिजिटल युगाची कास धरली आहे. आरबीआयने गेल्या वर्षाच्या अखेरीस डिजिटल चलनाची (Digital Currency) सुरुवात केली होती. अर्थात अजून हा पथदर्शी प्रकल्प आहे. हा पायलट प्रकल्प काही बँकां आणि विक्रेत्यांपुरता मर्यादीत आहे. या पथदर्शी प्रकल्पात आरबीआयने मुंबईतील एक फळविक्रेता आणि चहा विक्रेत्याचा समावेश केला आहे. त्यांच्यामार्फत किरकोळ विक्रीसाठी काय मर्यादा आणि समस्या येऊ शकतात, काय सुधारणा करता येऊ शकतात याची चाचपणी सुरु आहे. बिझनेस टायकून आनंद महिंद्रा (Anand Mahindra) बुधवारी या प्रकल्पाचा भाग झाले. त्यांनी ई-रुपयाच्या (E-Rupee Payment) माध्यमातून व्यवहार पूर्ण केला.

डिजिटल रुपया पथदर्शी प्रकल्पात मुंबईतील फळ विक्रेता आणि चहा विक्रेत्याचा सहभाग आहे. मूळ बिहारचे असलेले बच्चेलाल सहानी फळ विक्रेता आहे. तर मूळ राजस्थानचे जगदीश पटेल आरबीआयच्या मुख्यालयासमोर चहा विक्री करतात.

हे सुद्धा वाचा

हे दोघेही डिजिटल करन्सी प्रकल्पाचा भाग आहेत. महिंद्रा यांनी सहानी यांच्याकडून डाळिंब खरेदी केले आणि रोख रक्कम न देता डिजिटल रुपयात पेमेंट केले. ई-रुपयाच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण झाला. आनंद महिंद्रा यांनी याविषयीचा त्यांचा अनुभव ट्विटरवर शेअर केला.

बुधवारी आनंद महिंद्रा यांनी याविषयीचा व्हिडिओ शेअर केला. रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत डिजिटल करन्सीविषयी शिकण्याची संधी मिळाली. बैठकीनंतर बच्चेलाल सहानी यांच्याकडे फळ खरेदी केली. सहानी हे देशातील मोजके असे व्यापारी आहेत, ज्यांच्याकडे ई-रुपीतून व्यवहार होऊ शकतो. त्यांना डिजिटल रुपयातून पेमेंट केले, असे ट्वीट महिंद्रा यांनी केले.

सहानी हे गेल्या 29 वर्षांपासून मुंबईत आरबीआयच्या मुख्यालयासमोर फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. आरबीआयने त्यांना डिजिटल रुपया पथदर्शी प्रकल्पात सहभागी करुन घेतले. डिजिटल रुपया CBDC- R मध्ये किरकोळ विक्रेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे.

फळ विक्रेता बच्चेलाल सहानी यांनी याप्रकल्पातील सहभागाविषयी माहिती दिली. त्यानुसार, आरबीआयने त्यांना डिजिटल रुपयाचा QR Code दिला. त्यांचे खाते आयडीएफसी फर्स्ट बँकेत ( IDFC First Bank) उघडण्यात आले. त्यांना या खात्यात ई-रुपयाच्या व्यवहाराची रक्कम प्राप्त होत आहे.

आतापर्यंत सहानी यांच्या खात्यात जवळपास 1,500 रुपयांचे डिजिटल पेमेंट जमा करण्यात आले आहे. तर चहा विक्रेता जगदीश पटेल हे गेल्या 20 वर्षांपासून चहा विक्री करत आहे. त्यांनाही डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी क्यू आर कोड देण्यात आला आहे. त्यांच्याही खात्यात रक्कम जमा होत आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिसेंबर 2022 मध्ये पहिल्याच दिवशी 1.71 कोटी रुपयांचे डिजिटल चलन जारी केले. पायलट प्रकल्पातील चार बँकांनी या चलनाची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि भुवनेश्वर येथे डिजिटल रुपयाची सुरुवात झाली. चार बँकांच्या माध्यमातून डिजिटल चलन उपलब्ध करुन देण्यात आले.

पहिल्या टप्प्यात देशातील चार शहरातील State Bank Of India, ICICI Bank, Yes Bank आणि IDFC First Bank यांच्या माध्यमातून चलन बाजारात आणण्यात आले. त्याद्वारे ग्राहकांनी आभासी चलनातून व्यवहार पूर्ण केला.

बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा या बँकाही या प्रकल्पात आहेत. दुसऱ्या पायलट टप्प्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदुर, कोच्ची, लखनऊ, पाटणा आणि शिमल्यात डिजिटल रुपयांचा डंका वाजेल.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.