ATM मध्ये फक्त 55 सेकंदात मिळणार गरम इडली, Anand Mahindra विचारतायत, चवीला कशी आहे?
एटीएम मशीन फक्त 55 सेकंदात तुम्हाला गरम गरम इडली देणार आहे.
बंगळुरूः सध्याच्या जगात भूक लागली तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तरीही समजा तुम्ही कोणत्यातरी वसतिगृहात आहात. आणि मध्यरात्री तुम्हाला प्रचंड भूक लागली आहे. तर तुमच्याकडे एकच पर्याय असेल तो म्हणजे इलेक्ट्रिक किटलीमध्ये (electric kitly) नूडल्स (Noodles) बनवणे आणि ते भूकेसाठी खाणे. किंवा तुम्ही रात्री उशिरा ऑफिसमधून घरी आला आहात त्यावेळी तुम्हाला ऑनलाइन ऑर्डर डिलिव्हरीदेखील शक्य नाही. त्यावेळी तुम्हील काय कराल असं वाटतं, तुम्हाला त्यावेळी तुमच्या भुकेची काळजी वाटेल मात्र आता यावर एक भन्नाट कल्पना शोधून काढण्यात आली आहे.
So many have attempted to create robotic food prep/vending machines. Presume this meets FSSAI standards & the ingredients are refreshed adequately? How is the taste, Bengaluru folks? I’d love to see this pop up in airports/malls globally. Will be a major ‘cultural’ export! pic.twitter.com/C8SjR6HwPK
— anand mahindra (@anandmahindra) October 16, 2022
बंगळुरूच्या एका कंपनीने या समस्येवर एक उपाय शोधला आहे. तो म्हणजे एटीएम मशीनचा शोध लावण्यात आला आहे. जी एटीएम मशीन फक्त 55 सेकंदात तुम्हाला गरम गरम इडली देणार आहे.
इतकंच नाही तर ताजी आणि स्वच्छ इडली बनवून तेच मशिन तुमची ऑर्डर तुमच्यासमोर तयार करुन पॅक करुनही मिळणार आहे. म्हणजेच 1 मिनिटापेक्षा कमी वेळेत तुम्हाला या मशीनमधून इडलीचं पार्सल मिळणार आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या मशीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. फ्रेश हॉट नावाच्या स्टार्टअप कंपनीकडून बंगळुरूमध्ये हे इडली एटीएम बनवण्यात आले आहे. या मशीनवर मेनू स्कॅन करून तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता, त्यामुळे याच एटीएमची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
तुम्ही इडलीसोबत हवी असलेली चटणी वापरू शकता. त्यासाठी लागणारे पेमेंटदेखील तुमच्या फोनवरूनच केले जाणार आहे. हे पूर्णपणे स्वयंचलित असलेले इडली एटीएम एका वेळी 27 इडली ऑर्डर करू शकणार आहे.