वैदिक पद्धतीने अनंत-राधिका अडकणार विवाह बंधनात; आकर्षक लग्नपत्रिका पाहिली का?

Anant-Radhika Wedding Card : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्रिका पण समोर आली आहे. हिंदू रितीरिवाजांसह हे लग्न होईल. कशी आहे ही लग्नपत्रिका?

वैदिक पद्धतीने अनंत-राधिका अडकणार विवाह बंधनात; आकर्षक लग्नपत्रिका पाहिली का?
Anant Ambani Radhika Merchant Wedding Card
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 4:00 PM

आशियातील दिग्गज उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याची मैत्रिण राधिका मर्चेंटसोबत तो लग्नगाठ बांधत आहे. अनंत-राधिका 12 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेंकशन सेंटरमध्ये लग्न करतील. हिंदू वैदिक पद्धतीने हे लग्न होत आहे. यापूर्वी हे लग्न लंडनमधील आलिशान हॉटेल स्टोक पार्कमध्ये होईल, असा दावा करण्यात येत होता. पण नंतर हे लग्न मुंबईत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या लग्नाची पत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिची पहिली झलक वृत्तसंस्था एएनआयने ट्विट करत समोर आणली आहे.

12 ते 14 जुलै दरम्यान कार्यक्रम

हे सुद्धा वाचा

वृत्तसंस्था ANI ने ट्विट करत अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची पत्रिका समोर आणली आहे. ही पत्रिका साधी पण तितकीच आकर्षक दिसत आहे.12 जुलै रोजी लग्नकार्य होईल. शनिवारी, 13 जुलै रोजी वधू-वरांना आशिर्वादाचा दिवस, रविवार, 14 जुलै रोजी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

प्री वेडिंग कुठे करणार

अनंत-राधिका यांच्या लग्नापूर्वी त्यांचे दुसरे प्री-वेडिंग होईल. हा सोहळा 7000 कोटींच्या आलिशान क्रुझ शिपवर होईल. या कार्यक्रमाला 800 VVIP पाहुणे आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यात पण जागतिक आणि देशातील अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. हा सोहळा पण नेत्रदीपक करण्यासाठी जागतिक सेलेब्रिटी हजेरी लावण्याची शक्यता आहे. यापूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन झाले होते. त्यावेळी 1259 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आता त्यापेक्षा या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.

असा असेल प्री-वेडिंग सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या लग्नपूर्व सोहळ्याची पार्टी तीन दिवसांची आहे. आज या सोहळ्याचा तिसरा दिवस आहे. 28 मे रोजी पाहुण्यांचे क्रुझवर स्वागत झाले. दुसऱ्या दिवशी खाद्यपदार्थांसह थीम बेस विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. यामध्ये ड्रेस कोडसह इतर थीमवर पाहुण्यांना थिरकता येईल. आज रात्री थीम ला डोल्से फार निएंटे आहे. रात्री पार्टी रंगेल. उद्या थीम वी टर्न्स वन अंडर द सन, ले मास्करेड, आणि पार्डन माय फ्रेंच आहे. शनिवारी थीम ला डोल्से वीटा असेल. त्यात इटलीचा समर ड्रेस कोड असेल.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....