Anant-Radhika Wedding | काय अनंत-राधिका रचणार इतिहास? लग्नासाठी इतक्या कोटींचा खर्च

Anant Ambani-Radhika Merchant Wedding | मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चेंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या लग्नाची प्री-वेडिंग सेरेमनी 1 ते 3 मार्चपर्यंत गुजरातमधील जामनगर येथे होत आहे. मुकेश अंबानी त्यांच्या लहान मुलाच्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे.

Anant-Radhika Wedding | काय अनंत-राधिका रचणार इतिहास? लग्नासाठी इतक्या कोटींचा खर्च
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 11:59 AM

नवी दिल्ली | 1 March 2024 : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या लहान मुलगा, अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चेंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचा लग्नपूर्वी सोहळा, विधी 1 ते 3 मार्च दरम्यान होत आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हे मंगलकार्य होत आहे. या प्री वेडिंगसाठी बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, देशातील मान्यवर, अनेक बडे उद्योजक, बॉलिवडूचे सेलिब्रिटी अनेकांची उपस्थिती असेल. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका यांचे लग्न अगदी भव्य-दिव्य असेल. या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च होईल. अनंत आणि राधिकाचे लग्न या खर्चाबाबत इतिहास रचेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नात कोट्यवधी खर्च करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 1 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. रिपोर्ट्सनुसर, अनंत अंबानी याचे लग्न देशातील सर्वात महागडे लग्न ठरेल. यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च होतील. मुलीच्या लग्नातही मोठा खर्च करण्यात आला होता.

ईशा अंबानीच्या लग्नात कोट्यवधींचा खर्च

हे सुद्धा वाचा

देशातील सर्वात महागड्या लग्नांची चर्चा केली असता, ईशा अंबानीचे लग्न या यादीत सर्वात टॉपवर आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या लाडक्या कन्येच्या लग्नात 700 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर सुब्रत रॉय यांच्या लग्नात सर्वाधिक खर्च करण्यात आला होता. ईशा अंबानी हिने लग्नात 90 कोटींचा लहेंगा खरेदी करुन विश्वविक्रम केला होता. तर बॉलिवूडची तारका दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे बजेट जवळपास 90-95 कोटी रुपये होते. सियासत डॉट कॉमच्या वृत्तानुसार अनंत-राधिका यांच्या या आलिशान लग्नात 1000 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो.

अनंत-राधिका यांचा रेकॉर्ड

मीडियातील वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नात जवळपास 1,000 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे लग्न कुटुंबातील सर्वात महागडे लग्न असेल. तर देशातील पण महागडे लग्न ठरेल. ईशाच्या लग्नात मिक्का सिंग याने 10 मिनिटांच्या शो साठी दीड कोटी रुपये घेतले होते. अनंत अंबानी याच्या लग्नात रिहानाचा लाईव्ह शो, अरिजीत सिंहचा लाईव्ह परफॉरमन्स आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.