Anant Radhika Wedding : राधिकाच्या वडिलांचा मोठा बिझनेस.. मुकेश अंबानी यांच्या व्याह्यांकडे किती संपत्ती ?
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या दोघांचं 12 जुलै रोजी लग्न होणार असून गेल्या आठवड्यापासून विविध फंक्शन्स सुरू आहेत. अनेक व्हीव्हीआयपी, सेलिब्रिटी हे देखील लग्नाला उपस्थित राहणार आहेत. अंबानींची भावी सून राधिका हिचे वडील वीरेन मर्चंट हे हेल्थकेअर क्षेत्रातील मोठे नाव आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घरी शहनाईचे सूर घुमू लागले आहेत. मुकेश आणि नीता यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी होणार आहे. गेल्या आठवड्यापासून विविध फंक्शन्स सुरू आहेत. मामेरू, संगीत, हळद , मेहंदी अशा विविध कार्यक्रमांना अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. दरम्यान, मुकेश अंबानींच्या इतर दोन व्याह्यांप्रमाणेच हे तिसरे व्याही देखील अतिशय श्रीमंत आहे. अंबानींची भावी सून राधिका हिचे वडील, वीरेन मर्चंट हे नामवंत व्यक्ती आहेत. हेल्थकेअर क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. कोण आहेत वीरेन मर्चंट, त्यांची संपत्ती किती जाणून घेऊया..
कोण आहेत वीरेन मर्चंट ?
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा हेल्थकेअर कंपनी चालवणाऱ्या वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करणार आहे. वीरेन मर्चंट, हे अंबानींचे तिसरे व्याही बनणार आहेत ते इतर व्याह्यांप्रमाणेच अतिशय श्रीमंत आहेत. वीरेन हे एन्कोअर या हेल्थकेअर कंपनीचे सीईओ आहेत. रिपोर्ट्सनुसार, 2000 कोटी रुपयांची ही कंपनी चालवणाऱ्या राधिकाच्या वडिलांची एकूण संपत्ती 755 कोटी रुपये आहे. अंबानी कुटुंबाची सून होणारी राधिका मर्चंटही वडिलांच्या व्यवसायात मदत करते.
अजय पिरामल हे ईशा अंबानीचे सासरे
मुकेश अंबानी यांचे दुसरे व्याही आणि त्यांची लेक ईशा अंबानी हिचे सासरे अजय पिरामल यांच्याकडेही अफाट संपत्ती आहे. त्यांचा पिरामल ग्रुप देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ग्रुप्समधील आहे. फार्मा, हेल्थकेअर आणि फायनॅन्शिअल सर्व्हिसेसमध्ये असलेल्या पिरामल ग्रुपच्या ( Piramal Group) जगातील 30 देशांमध्ये शाखा आहेत. अजय पिरामल यांच्याशिवाय त्यांची पत्नी स्वाती पिरामल या पिरामल बोर्डाच्या उपाध्यक्षा आहेत. मुलगी नंदिनी आणि मुलगा आनंद पिरामल (ईशाचा नवरा) यांचाही बोर्डात समावेश आहे. फोर्ब्सनुसार, अजय पिरामल यांची एकूण संपत्ती 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 25,051 कोटी रुपये) आहे.
मुकेश अंबानींचे हे व्याही आहेत हिरे व्यापारी
मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याचे लग्न श्लोका मेहता हिच्याशी झाले. तिचे वडील अरुण रसेल मेहता हे मुकेश अंबानी यांचे व्याही आहेत. रसेल मेहता यांची गणना देशातील बड्या हिरे व्यावसायिकांमध्ये केली जाते. त्यांच्या रोझी ब्लू कंपनीचा व्यवसाय अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. या कंपनीचा जगातील टॉप डायमंड कंपन्यांमध्ये समावेश होतो. एकट्या भारतातच 26 शहरांमध्ये त्यांची 36 पेक्षा जास्त दुकाने आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
मुकेश अंबानींची संपत्ती किती ?
मुकेश अंबानींच्या तिन्ही व्याह्यांकडे अफाट संपत्ती असली तरी ईशा अंबानीचे सासरे अजय पिरामल हे संपत्तीच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. तर रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेट वर्थबद्दल बोलायचं झालं तर , ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 120 अब्ज डॉलर्स आहे. या आकडेवारीमुळे, ते जगातील 11 वे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी 2024 पर्यंत मुकेश अंबानींची नेटवर्थ 23 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढली आहे.