Anant Radhika Wedding : लग्न अनंत आणि राधिकाचं, हॉटेल इंडस्ट्रीची चांदी, फाईव्ह स्टार हॉटेलचं एका रात्रीचं भाडं तब्बल…
Anant-Radhika Ambani wedding venue : अंबानी कुटुंबांतील हा सोहळा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाह सोहळ्याचे कार्यक्रम 12 ते 14 जुलैपर्यंत चालणार आहेत. या सोहळ्यासाठी जगभरातील कला क्षेत्र तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्हीआयपी मंडळी आर्वूजन पाहणार आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलगा अनंत अंबानी याचा विवाह राधिका मर्चंट हीच्याशी येत्या 12 जुलै रोजी होत आहे. या लग्न सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या विवाह सोहळ्याला जगभरातील नामीगिरामी व्यक्त हजर राहणार आहेत. बॉलिवूड आणि राजकारणातील मोठ्या व्यक्ती या सोहळ्याला येणार आहेत. त्यामुळे वांद्रे कुर्ला कॉप्लेक्स येथील पंचतारांकित हॉटेलाच्या रुमचे भाडे लाख रुपयांपर्यंत पोहचले आहे.
12 जुलै रोजी बीकेसीच्या जियो वर्ल्ड कन्व्हेन्शनमध्ये अनंत अंबानी ( Anant Ambani ) आणि राधिका मर्चेंट ( Radhika Merchant ) यांचा विवाहाची घटीका समीप आली आहे. येत्या 12 जुलै रोजी बीकेसीच्आ जियो वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर ( Jio World Convention Centre ) हा भव्य विवाह सोहळा रंगणार आहे. त्यामुळे बीकेसी या मुंबईतील पॉश परिसरातील होटेल्सचे भाडे जे पुर्वी 13000 रुपये होते, ते आता 91,350 रुपयांनी वाढले आहे. लग्नासाठी येणारी मंडळींचा मुक्काम नेमका कुठे असणार आहे. याचा काहीही खुलासा झालेला नाही. परंतू बीकेसी परिसरातील हॉटेलचे दर वाढले आहेत.
अंबानी कुटुंबांतील हा सोहळा जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रम 12 ते 14 जुलैपर्यंत चालणार आहे. मुंबई पोलिसांना या लग्न सोहळ्यानिमित्त बीकेसीला जाणाऱ्या सर्व मार्गावरील वाहतूकीत बदल केला आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरच्या दिशेने जाणारे रस्ते 12 ते 15 जुलै दरम्यान रात्री एक ते मध्यरात्रीपर्यंत सर्वसामान्यांच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहे. पंचतारांकित हॉटेल्स वेबसाईट पाहीली असता त्यावर 10 ते 14 जुलै दरम्यान कोणताही स्यूट किंवा रुम उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. यात बीकेसीतील ट्रायडेंट आणि सोफिटेल या पंचतारांकित हॉटेल्सची नावे आहेत. ग्रँड हयात, ताज सांताक्रुझ, ताज वांद्रे आणि सेंट रेजीस सारख्या 5 स्टार होटेल्समधील रुम्स अजूनही उपलब्ध असल्याचे समजते.
कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम
बीकेसीत वाहनांना बंदी केल्याने आता बीकेसीतील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देऊ शकतात असे म्हटले जात आहे. 12 जुलै रोजी शुक्रवार असल्याने बहुतांश कंपन्या आपल्या कामगारांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देऊ शकतात. बीकेसीमध्ये बँक ऑफ बडोदा, इंडियन ऑईल, गोदरेज बीकेसी, एसबीआय, डायमंड बोर्स, रिजर्व बँक ऑफ इंडिया, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि व्ही वर्क सारख्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालये आहेत.