LIC IPO: सरकारची स्ट्रॅटेजी अकार्यक्षम, ‘एलआयसी’ आयपीओकडं ‘या’ गुंतवणुकदारांची पाठ?
अखेरच्या दिवसापर्यंत निर्धारित उद्दिष्टापर्यंत पोहचण्यास सरकार अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी आयपीओत विदेशी गुंतवणुकदारांनी मोठा प्रतिसाद दिला होता. पेटीएम, झोमॅटो आयपीओत ब्लॅकरॉक, कॅनडा पेन्शन सहित अन्य गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षीत एलआयसी आयपीओचा (LIC IPO) आज अखेरचा दिवस आहे. आयपीओच्या यशस्वीतेसाठी केंद्र सरकारनं सर्वोपतरी पाऊलं उचलली. दरम्यान, परकीय गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यास सरकार अपयशी ठरल्याचं चित्र दिसून आलं आहे. परकीय गुंतवणुकींचा ओघ वाढविण्याच्या हेतून सरकारने एफडीआय नियमांत फेररचना केली होती. जागतिक स्तरावरील गुंतवणूक (GLOBAL INVESTOR) आस्थापनांना सरकारनं निमंत्रण धाडली होती. नॉर्वे आणि सिंगापूर सॉवरेन फंड व्यतिरिक्त अन्य परकीय गुंतवणूकदारांनी आयपीओकडे पाठ फिरवली. एलआयसीने अँकर गुंतवणुकदारांकडून (ANCHOR INVESTOR) सात हजार कोटी रुपयांची उभारणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, अखेरच्या दिवसापर्यंत निर्धारित उद्दिष्टापर्यंत पोहचण्यास सरकार अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी आयपीओत विदेशी गुंतवणुकदारांनी मोठा प्रतिसाद दिला होता. पेटीएम, झोमॅटो आयपीओत ब्लॅकरॉक, कॅनडा पेन्शन सहित अन्य गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र, त्यातुलनेत एलआयसी आयपीओकडे गुंतवणुकदारांकडे पाठ फिरवल्याची चित्र आहे.
गुंतवणुकदारांचे ‘नो रिस्क’:
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरू आहे. त्यामुळे गुंतवणूक मूल्य घटण्याची भीती विदेशी गुंतवणुकदारांना आहे. तसेच भारतीय शेअर बाजारात अस्थिरतेमुळे मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. चालू वर्षात आतापर्यंत 1.33 लाख कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री दिसून आली. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सावधतेनं पाऊलं उचलल्याचं चित्र दिसून आलं.
प्री-प्लेसमेंट प्लॅनिंग:
जागतिक गुंतवणुकदारांना आकर्षिक करण्यासाठी एलआयसीनं धोरणात्मक निर्णय घेतले होते. प्री-प्लेसमेंटच्या माध्यमातून एलआयसी आयपीओला अँकर इन्व्हेस्टरचा प्रतिसाद मिळाला होता. अर्थक्षेत्रातील जाणकरांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसी आयपीओत अँकर इन्व्हेस्टरने 7000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली होती. केंद्र सरकारने एलआयसी आयपीओ साठी 50-60 अँकर इन्व्हेस्टर्सची निवड केली होती.
सवलतींचा वर्षाव:
एलआयसी आयपीओसाठी प्रति शेअर 902-949 रुपयांचा प्राईस बँड (price band) निश्चित करण्यात आला आहे. मात्र, एलआयसी पॉलिसीधारक, कर्मचारी किंवा रिटेल गुंतवणुकदार असल्यास 60 रुपयांचा डिस्काउंट दिला होता. एलआयसीने पॉलिसी धारकांसाठी प्रति शेअर 60 रुपये, रिटेल गुंतवणुकदार (retail investor) तसेच कर्मचाऱ्यांसाठी 45-45 रुपये शेअर डिस्काउंट देण्याची घोषणा केली होती.
एलआयसी आयपीओची ठळक वैशिष्ट्य-
· आयपीओच्या माध्यमातून सरकारची एलआयसीतील 3.5 टक्के भागीदारी विक्री
· पॉलिसी धारकांना 60 रुपये आणि रिटेल आणि कर्मचाऱ्यांना 45 रुपयांचा डिस्काउंट
· आयपीओचा लॉट साईझ 15 शेअर्सचा
· एलआयसीने आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राईस ब्रँड निश्चित
· आयपीओच्या माध्यमातून 22 कोटींहून अधिक शेअर्सची विक्रीचं लक्ष्य
· अँकर गुंतवणुकदारांसाठी 5.9 कोटी, कर्मचाऱ्यांसाठी 15.8 लाख, पॉलिसीधारकांसाठी 2.2 कोटी शेअर