कोरोना काळात अनिल अंबानींना सर्वात मोठा दिलासा, 4,206 कोटींच्या तोट्यानंतर भरघोस नफा
त्यामुळे अनिल अंबानी आणि रिलायन्स इन्फ्राचे सीईओ राजा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Reliance Power profit in March quarter)
मुंबई : कोरोना काळात अनेक बिझनेस डबघाईला आले आहेत. तर दुसरीकडे उद्योगपती आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांच्या कंपनीला नफा मिळाला आहे. कोरोना काळात रिलायन्स पॉवर या कंपनीने 72 कोटींचा नफा कमावला आहे. रिलायन्स पॉवर ही कंपनी पूर्वी रिलायन्स एनर्जी या नावाने ओळखली जात होती. याच कंपनीला कोरोना काळात चांगला नफा मिळाला आहे. (Reliance Power posts 73 rs crore profit in March quarter)
रिलायन्स पॉवरने मार्च 2021 च्या तिमाहीत 72.56 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर मार्च 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 4,206.38 कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. म्हणजेच कंपनीला 4,206 कोटींचा तोटा सहन करावा लागल्यानंतरही 72.56 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे अनिल अंबानी आणि रिलायन्स इन्फ्राचे सीईओ राजा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उत्तपन्नातही वाढ
विशेष म्हणजे रिलायन्स पॉवरला या काळात नफ्यासोबतच उत्पन्नातही वाढ झाली आहे. या वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न हे 1,691.19 कोटी रुपये होते. तर एका वर्षापूर्वी याच काळात 1,902.03 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. तर 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला एकत्रित निव्वळ नफा 228.63 कोटी रुपये इतका होता. तर 2019-20 मध्ये हा नफा 4,076.59 कोटी इतका होता. तर वर्ष 2020-21 में कंपनीचे एकूण उत्पन्न 8,388.60 कोटी रुपये इतके होते. तर गेल्या आर्थिक वर्षात 8,202.41 कोटी रुपये इतके होते.
लॉकडाऊनवरुन अनेक सवाल
दरम्यान या अनिल अंबानी यांचा मुलगा आणि रिलायन्स इन्फ्रा (RInfra) आणि रिलायन्स कॅपिटलचे (Reliance Capital) डायरेक्टर अनमोल अंबानी यांनी लॉकडाऊनवरुन सवाल केले होते. कलाकार त्यांचे चित्रपट शूट करू शकतात. क्रिकेट खेळणारे खेळाडू रात्री उशिरापर्यंत आपला खेळ खेळू शकतात. नेतेमंडळी त्यांचे मेळावे गर्दीसह सुरु ठेवू शकतात. पण एखादा बिझनेस किंवा काम हे अत्यावश्यक सेवेत येत नाही, असे ट्वीट त्यांनी केले होते.
मालमत्ता विकण्याचा निर्णय
दरम्यान वाढत्या कर्जामुळे अनिल अंबानी यांना रिलायन्स इन्फ्राचे मुंबई हेड ऑफिस येस बँकेला विकावे लागले होते. हा व्यवहार 1200 कोटी रुपयांमध्ये झाला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसा, मिळालेल्या पैशांनी रिलायन्सने येस बँकेचे कर्ज परत केले होते. अनिल अंबानी संचालित रिलायन्स इन्फ्रावरील थकबाकी वसूल करण्यासाठी आर्थिक कारवाई केली गेली होती. त्यावेळी रिलायन्स इन्फ्राला वाढत्या दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागला होता. म्हणजेच नियमानुसार जर एखाद्या बँकेने कंपनीची इमारत ताब्यात घेतली तर बँकेला दोन महिन्यांपूर्वी नोटीस द्यावी लागते. जी यापूर्वीच येस बँकेने आधीच दिली होती. (Reliance Power posts 73 rs crore profit in March quarter)
संबंधित बातम्या :
नोकरदारांना फुकटात मिळते 7 लाखांची सुविधा, कधी आणि कसे पैसे मिळू शकतात?
Paytm First Credit Card : पेटीएमचा धमाका, प्रत्येक व्यवहारावर 3 % कॅशबॅक, कार्डवर जबरदस्त फायदा