अनिल अंबानींचा रिलायन्स पॉवरच्या संचालकपदाचा राजीनामा

अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Reliance Infrastructure) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड 'सेबी'ने स्टॉक एक्सचेंजमध्ये (Share Market) कोणत्याही सूचीबद्ध कंपनीत सहभागी होण्यास मनाई कोली होती.

अनिल अंबानींचा रिलायन्स पॉवरच्या संचालकपदाचा राजीनामा
अनिल अंबानी
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 7:21 AM

अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (ADAG) अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Reliance Infrastructure) संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ‘सेबी’ने स्टॉक एक्सचेंजमध्ये (Share Market) कोणत्याही सूचीबद्ध कंपनीत सहभागी होण्यास मनाई कोली होती. सेबीच्या या निर्णयानंतर अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. याबाबत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने माहिती देताना म्हटले आहे की अनिल अंबानी यांना ‘सेबी’ने स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये सहभागी होण्यास मनाई कोली होती. त्यामुळे त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात अनिल अंबानी यांच्यासह अन्य दोन उद्योगपतींवर ही कारवाई करण्यात आली होती. अनिल अंबानी यांनी राजीनामा दिल्यावर आता त्यांच्या जागी शुक्रवारी राहुल सरीन यांची पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अद्याप या नियुक्तीवर सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब बाकी आहे.

गौतम अदानी रिलायन्स कॅपिटल खरेदी करणार?

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीवर कर्जाचा बोजा वाढतच आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शिअल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह 14 मोठ्या कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. रिलायन्स कॅपिटलवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाकडून कंपनीच्या खरेदीसाठी बोली लावण्याची मुदत वाढवण्यात आली होती.

कंपनीवर 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज

सप्टेंबर 2021 मध्ये रिलायन्स कॅपिटलची वार्षिक सर्वधारण सभा पार पडली होती. या सभेत कंपनीने आपल्या शेअरधारकांना कंपनीवरील कर्जाची माहिती दिली होती. कंपनीवर 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले होते. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीचा तब्बल 3966 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामुळे आता या कंपनीच्या विक्रीची नामुष्की ओढावली आहे. रिलायन्स कॅपिटल या कंपनीची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Inflation: महागाईचा आणखी एक मोठा झटका; एप्रिलपासून आठशेपेक्षा अधिक औषधांच्या दरात वाढ

Gold, silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी, जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या, चांदीचे भाव

भविष्यात पेट्रोल, डिझेल आणखी महागणार ; पेट्रोलियम कंपन्यांना तीन महिन्यात 19 हजार कोटी रुपयांचा तोटा

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....