Gautam Adani : हिंडनबर्गनंतर सेबीचा वार, गौतम अदानी यांना झटका, संपत्तीत इतकी घट

Gautam Adani : गौतम अदानी यांना सेबीने पण झटका दिला. हिंडनबर्ग अहवालामुळे फेब्रुवारीपासून अदानी समूहाला वाईटचं वार्तांचा सामना करावा लागत आहे. तरीही कंपनी या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

Gautam Adani : हिंडनबर्गनंतर सेबीचा वार, गौतम अदानी यांना झटका, संपत्तीत इतकी घट
संपत्तीत घट
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 6:58 PM

नवी दिल्ली : गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या मागील शुक्लकाष्ट कमी होण्याची चिन्हे नाहीत. हिंडनबर्ग अहवालाने (Hindenburg Report) त्यांना सर्वात मोठा झटका गेला. तेव्हापासून अदानी समूह या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकला नाही. या समूहाचे प्रचंड नुकसान झाले. तर गौतम अदानी यांची संपत्ती झपाट्याने घसरली. जगातील दुसऱ्या क्रमांकावर मांड ठोकणाऱ्या अदानी यांना टॉप 30 मधून बाहेर पडावे लागेल होते. त्यानंतर त्यांनी या यादीत पुन्हा कमबॅक केले. पण आता सेबीने (SEBI) घेतलेल्या एका निर्णयाने त्यांना मोठा झटका बसला आहे. श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक पुन्हा एकदा घसरला आहे.

सेबीचा दणका

शेअर बाजाराची नियामक संस्था सेबीने अदानी समूहाच्या कराराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही वार्ता बाजारात पसरल्यावर गुंतवणूकदारांच्या चिंता वाढली आहे. गौतम अदानी यांना याचा मोठा फटका बसला. त्यांच्या संपत्तीत कमाल घसरण झाली. त्यांच्या संपत्तीत 1 अब्ज डॉलरची घसरण झाली. श्रीमंतांच्या यादीत ते पुन्हा खाली घसरले.

हे सुद्धा वाचा

व्यवहारांची होणार तपासणी

1 एप्रिल रोजी रॉयटर्सने त्यांच्या अहवालात ही माहिती दिली. त्यानुसार, अदानी समूहाच्या तीन परदेशी कंपन्यांशी केलेला करार सेबीच्या रडारवर आला आहे. स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने हा करार आणि व्यवहाराच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. हा करार करताना, व्यवहार करताना नियमांचे उल्लंघन झाल्याची सेबीला शंका आहे. ज्या तीन परदेशी कंपन्यांशी हा व्यवहार झाला, त्या कंपन्यांचा संबंध गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी याच्यासोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सेबीने या व्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले.

शेअर बाजारात फटका

सेबीने व्यवहार तपासण्याचे निर्देश देताच, अदानी समूहाच्या शेअरला फटका बसला. सोमवारी बाजार उघडताच अदानी समूहाचे शेअरमध्ये पडझड सुरु झाली. बाजार बंद होताना अदानी इंटरप्राईजेस 1.89 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 4.96 टक्के, अदानी पोर्टस 0.65 टक्के, अदानी पॉवर 0.55 टक्के, अदानी विल्मर 2.50 टक्के, अदानी टोटल गॅस 2.58 टक्के आणि एनडीटीव्ही 2.87 टक्के घसरले. तर अदानी ट्रान्समिशनमध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागले.

श्रीमंतांच्या यादीत घसरण

सेबीने व्यवहार आणि करार तपासण्याचे आदेश देताच बाजारात भूकंप आला. बाजारात अदानी समूहाचे शेअर घसरले. त्यामुळे अदानी यांना नुकसान झाले. त्यांची संपत्ती 24 तासात 1.2 अब्ज डॉलरने घसरली. तर अदानी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलिनिअर्सच्या यादीत 24 व्या क्रमांकाहून थेट 27 व्या क्रमांकावर पोहचले. फोर्ब्सनुसार अदानी यांची एकूण संपत्ती 43.1 अब्ज डॉलर आहे.

एका रिपोर्टने अदानी साम्राज्य हादरले

हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांच्या कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. 24 जानेवारी रोजी अहवाल आल्यापासून गौतम अदानी यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. एका अहवालानुसार, अदानी यांचे मार्केट कॅप 120 अब्ज डॉलरने घटले आहे. त्यांची जवळपास 100 अब्ज डॉलर संपत्ती गायब झाली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.